रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • Book Tickets
    • Marathi Natak Info
    • Shows Calendar
    • News
      mushafiri cover 2

      पु.लंसोबत एका बहुरंगी ‘मुशाफिरी’चा आस्वाद घ्यायला चला!

      March 17, 2023
      Paach Futacha Bachchan Marathi Natak

      ‘रोम रोम रंगमंच’चे नवे नाटक – पाच फुटाचा बच्चन

      February 28, 2023
      janmavaari marathi natak

      जन्मवारी: जन्मापासून मृत्यूपर्यंत समाधानी वारी

      February 17, 2023
      Yetoy to Khatoy Marathi Natak

      सुयोगची नवी नाट्यकृती — येतोय तो खातोय!

      February 8, 2023
      Amar Photo Studio Marathi Natak Info

      ‘अमर फोटो स्टुडिओ’ शेवटच्याकाही मोजक्या प्रयोगांसह पुन्हा रंगभूमीवर!

      December 31, 2022
    • Reviews
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak Review

      अंधे जहाँ के अंधे रास्ते [Review] — शहराच्या घाणीत अडकलेल्या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा

      June 30, 2022
      Gunta

      गुंता एकांकिका [Review]- नात्यातल्या गुंत्याची एक अनोखी बाजू

      May 18, 2022
      Most Welcome Marathi Natak

      मोस्ट वेलकम [Review] — नव्या विचारप्रवाहाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या तरुणांचे समाजाला कळकळीचे आवाहन!

      April 18, 2022
    • Podcast
    • Opinion
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Pradeep Patwardhan Moruchi Mavshi Prashant Damle

      चटका लावणारी ‘एक्झिट’

      August 11, 2022
      Zapurza Kavyayog

      काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

      July 11, 2022
      Anandyatri

      आनंदयात्री स्नेहसंमेलन (GTG) सोहळा

      June 30, 2022
    • Events
      mushafiri cover 2

      पु.लंसोबत एका बहुरंगी ‘मुशाफिरी’चा आस्वाद घ्यायला चला!

      March 17, 2023
      arogyam dhanasampada prayogik kalamanch opening cover

      मकरंद देशपांडे यांच्या हस्ते ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंचाचे’ उद्घाटन — प्रायोगिक नाट्यमहोत्सवाने कलामंचाचा शुभारंभ

      October 17, 2022
      adpk prayogik natya mahotsav 2022 cover

      मालाडमध्ये नव्या रंगमंचाचा लवकरच शुभारंभ — शुभारंभाप्रीत्यर्थ नाट्यमहोत्सवाची घोषणा

      October 10, 2022
      anaam natyavaachan ekankika mejwani cover

      ‘अनाम’तर्फे रसिकांसाठी नाट्यवाचन आणि एकांकिकेची मेजवानी

      September 10, 2022
      zapurzaa 2022 cover

      झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव २०२२

      September 9, 2022
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»News»रंगभूमी.com वर नाटकांचं ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू!
    News 5 Mins Read

    रंगभूमी.com वर नाटकांचं ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू!

    Wondering where to buy natak tickets online? रंगभूमी.com now offers Online Ticket Booking services for Marathi Natak.
    By गायत्री देवरुखकरAugust 8, 2022Updated:August 8, 2022
    Online Natak Ticket Booking for Marathi
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लॉकडाऊनपश्चात, रंगभूमी.com च्या माध्यमातून आम्ही नाटकांची समीक्षणे, प्रयोगांचे वेळापत्रक, कलाकारांच्या मुलाखती, नाटकांबद्दल संपूर्ण माहिती आणि नाटकांशी संबंधित बरंच काही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. रंगभूमी.com आणि प्रेक्षकांमधील प्रवास अखंड सुरू राहावा हाच आमचा मानस आहे. कुठलं नाटक कुठल्या नाट्यगृहात किती वाजता बघता येईल याची माहिती आम्ही देतच होतो आणि आता तमाम रसिक प्रेक्षकांच्या विनंतीचा मान ठेवत आम्ही तुमच्या आमच्या रंगभूमी.com वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू करत आहोत. रंगभूमी.com ने हे नवं पाऊल खास तुमच्या सोयीसाठी उचललं आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही या ऑनलाईन सोयीचा पुरेपूर लाभ घ्याल. सध्या आमच्यासोबत मर्यादित नाटकं तिकीट विक्री साठी जोडली गेली असली तरी या सगळ्या नाटकांतून १००% मनोरंजनाची हमी आम्ही देऊ शकतो आणि पुढील प्रवासात तुमची साथ राहिली तर ही यादी अर्थातच वृद्धिंगत होत राहील.

    ऑनलाईन तिकीट बुकिंग लिंक (Book Natak Tickets Online)

    www.rangabhoomi.com/tickets/

    प्रेक्षकांसाठी खास वैशिष्ट्ये

    १. तुम्ही वरील लिंकला भेट दिली असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही तिकीट बुकिंग प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत ठेवली आहे.
    २. तरीही या प्रक्रियेत जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ९९९ २५६ २५६ १ या क्रमांकावर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही तुमच्यासाठी तिकीट बुक करू.
    ३. नाटकाच्या तिकिटांसोबत त्या नाटकाची पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
    ४. पूर्ण प्रक्रियेत तुम्हाला रंगभूमी.com तर्फे support देण्यात येईल.
    ५. आम्ही इतर ऑनलाईन बुकींग प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत अत्यंत अल्प दरात बुकींग फी आकारात आहोत, याची विशेष नोंद घ्यावी.
    ६. रंगभूमी.com ही एक नाट्य चळवळ आहे. तुम्ही रंगभूमी.com कडे ऑनलाईन तिकीट बुक करणे म्हणजे आमच्या आजवरच्या प्रयत्नांना मिळालेली दाद असेल.

    नाट्यसंस्थांसाठी खास वैशिष्ट्ये

    १. आमच्या या बुकींग प्रक्रियेत सर्व प्रकारच्या नाट्यानुभवांचे स्वागत आहे. नाटक, दीर्घांक, एकांकिका, नाट्यमहोत्सव, स्पर्धा अशा सर्व कार्यक्रमांची तिकिटे आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ.
    २. मुंबई व पुण्यासह महाराष्ट्रातील इतर बऱ्याच शहर व गावोगावच्या नाट्यगृहांचे Seating Charts आमच्याकडे उपलब्ध आहेत.
    ३. ऑनलाईन बुकींगसोबतच फोनवर Box Office पद्धतीनेही तिकीट बुकींग स्वीकारू.
    ४. प्रयोगानंतर काहीच दिवसात तुम्हाला जमा झालेली तिकिटांकची रक्कम सुपूर्द करण्यात येईल.
    ५. तुमच्या नाटकाबद्दल माहिती, लेख तसेच काही Promotional Content आमच्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर प्रकाशित केला जाईल.

    पहिल्या टप्प्यात आमच्याशी जोडली गेलेली नाटकं

    आमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून पहिल्याच टप्प्यात आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या पुढील नाट्यसंस्थांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. www.rangabhoomi.com/tickets/ या लिंकवर जाऊन तुम्ही आवडत्या नाटकाची तिकिटे बुक करू शकता!

    googleefy rangabhoomi tickets sales promo square
    andhe jahaan rangabhoomi tickets sales promo square
    Book tickets for Hich Tar Family Chi Gammat Aahe Marathi Natak

    हीच तर फॅमिलीची गंमत आहे • Online Ticket Booking

    सुपर डुपर कॉमेडी नाटकाचा नजराणा! समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही शारिरीक व्यंग (defect) असतात. अशातच, त्या कुटुंबांमध्ये कशाप्रकारे सोयरिक जुळून येते आणि ती जुळून येताना काय धमाल उडते हे बघण्यासाठी तुम्हाला या नाटकाला भेट द्यावी लागणार आहे. वेद प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात शलाका पवार, सागर कारंडे यांच्यासोबत सायली देशमुख, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन, रमेश वाणी हे गुणी कलाकारही आहेत.

    गोपाळ अलगेरी व सुनीता अहिरे यांची निर्मिती असलेल्या या नाटकाला अशोक पत्की यांचे संगीत लाभलेले असून गीतकार मिलिंद जोशी आहेत. नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. तर वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. एकंदरीतच काय? तर, अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि तांत्रिक अशा सर्वच बाजू सशक्त असलेलं हे विनोदी नाटक आपलं पोटभर मनोरंजन करणार आहे यात तिळमात्र शंका नाही.

    पुढील लिंकवर क्लिक करून तिकीट बुक करा.

    Buy tickets for Hich Tar Family Chi Gammat Aahe Marathi Natak


    अंधे जहाँ के अंधे रास्ते • Book Natak Tickets Online

    हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. या नाटकात मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांच्या घरात, परिवारात व वैवाहिक जीवनात काय अडचणी येतात याचं अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर मांडलं आहे. त्यांना पुरेसा पगार मिळत नाही व जितके पैसे मिळतात ते कधीही वेळेवर मिळत नाहीत. एवढंच काय त्यांना पुरेशी आरोग्यसेवादेखील मिळत नाही. त्यांच्या जातीमुळे व त्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना आयुष्यभर या गरिबीत जगावं लागतं. किंबहुना त्यांना गरिबीत जगवलं जातं, कारण त्यांनी जर हे काम केलं नाही तर मुंबई घाणीने तुंबून जाईल. त्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्या हीच घाण उपसत आल्या आहेत. मॅनहोलमधून येणाऱ्या त्या असह्य वासाला वैतागून हे कर्मचारी नशेच्या आहारी जातात. मॅनहोलमध्ये उतरताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही. हे कंत्राटी कामगार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुखसोयीदेखील त्यांना मिळत नाही. सरकार त्यांच्या या परिस्थितीची जबाबदारी कधी घेणार? अजून किती पिढ्या ही माणसं हेच काम करत राहणार? आणि त्यांच्या या समस्येचं निवारण आहे की नाही? असे बरेच प्रश्न विचारणारं हे नाटक आहे.

    पुढील लिंकवर क्लिक करून तिकीट बुक करा.

    Book tickets for Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak


    Googleefy • Ticket Booking for Marathi Natak

    एकविसाव्या शतकाने जशी technology माणसाच्या दारात आणली तशी आपल्या नकळत सगळ्यांच्या घरात एक नवीन सदस्य वास्तव्याला आला. Google! आणि आपण अजाणते असल्याचा आव आणत त्याच्याशी मैत्री वाढवत राहिलो. आज आपल्याला आपल्यापेक्षा जास्त तो ओळखतो. एक trip to goa असं search केलं की आपसूक चार गोव्यातल्या हॉटेलच्या advertise समोर येतात. आपल्या मनात जे गाणं आहे तेच search मध्ये खाली येतं. आणि त्याचं असं हे आपल्याला ओळखणं आपल्याला भावतं. पण पूर्वी कधीतरी phone number पाठ करणारी माणसं आज लोकांचे माहिती असलेले पत्ते सुद्धा लक्षात न ठेवता map वर टाकतात. ह्याचं अंतिम साध्य काय असेल तर कधीतरी माणूस डोक्याचा वापर करणं कमी करून टाकेल आणि संपूर्णपणे google वर विसंबून जाईल. अशीच परिस्थिती आल्यानंतर घडलेली ही गोष्ट आहे.

    पुढील लिंकवर क्लिक करून तिकीट बुक करा.

    Buy tickets for Googleefy Marathi Natak


    येत्या काही दिवसात इतरही नाटकांची तिकिटे रंगभूमी.com वर उपलब्ध होणार आहेत. आम्हाला आशा आहे की तुमची साथ आम्हाला अशीच मिळत राहील. जेणेकरून, बऱ्याच नाट्यसंस्था नजीकच्या काळात आमच्याशी जोडल्या जातील. आमचं हे ऑनलाईन तिकीटघर तुम्हाला आवडेल अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. तसेच, तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट बघत आहोत. आमचा हा नवा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

    Natak Tickets Online Booking
    book natak tickets online book tickets online buy marathi natak tickets online buy natak tickets online buy tickets online featured marathi natak online booking marathi natak phone booking online natak ticket booking Online Ticket Booking online ticket window
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleविश्वविक्रमी अजरामर नाटक ‘सही रे सही’ला २० वर्ष पूर्ण — लवकरच ५००० प्रयोगांचा टप्पा गाठणार!
    Next Article एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२२ — कलाविष्कारासाठी रंगमंच उपलब्ध करुन देणारी मानाची संस्था

    Related Posts

    mushafiri cover 2

    पु.लंसोबत एका बहुरंगी ‘मुशाफिरी’चा आस्वाद घ्यायला चला!

    March 17, 2023
    Paach Futacha Bachchan Marathi Natak

    ‘रोम रोम रंगमंच’चे नवे नाटक – पाच फुटाचा बच्चन

    February 28, 2023
    janmavaari marathi natak

    जन्मवारी: जन्मापासून मृत्यूपर्यंत समाधानी वारी

    February 17, 2023

    Leave A Reply Cancel Reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    — जाहिरात —
    Advertise Marathi Natak Here
    Social
    • YouTube
    • Facebook
    • Instagram
    • Twitter
    • WhatsApp
    • Telegram
    रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2023 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.