आम्ही काही नाटकांसाठी Giveaway जाहीर करून प्रेक्षकांना नाटकांची मोफत तिकिटे जिंकण्याची संधी प्राप्त करून देत असतो. जर तुम्हाला अद्याप या कॉन्टेस्टबद्दल काहीच माहिती नसेल तर पुढील लेख नक्की वाचा. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’ नाटकाची तिकिटे जिंकण्याची सुवर्णसंधी [Free Tickets Giveaway] या महिन्यात ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकासाठी बोरिवली, ठाणे व डोंबिवली अशा तीन ठिकाणी Giveaway कॉन्टेस्ट सुरू होता. तीनही ठिकाणांहून प्रेक्षकांकडून Giveaway ला उत्तम प्रतिसाद मिळाला. हा Giveaway आयोजित करण्यात आम्हाला ज्यांनी सहकार्य केले, असे वेद प्रोडक्शन हाऊसचे गोपाळ अलगेरी आणि विनय अलगेरी! या निर्मात्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. Giveaway जिंकलेल्या विजेत्यांनी आमच्यापर्यंत नाटकाबद्दल प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:…
Author: गायत्री देवरुखकर
मुंबई नगरीच्या हृदयस्थानी वसलेले दादर येथील नाट्यरसिकांचे लाडके, ‘श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह’ पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे आणि तेही अगदी नव्या रुपात! कित्येक अजरामर कलाकृतींनी संपन्न अशा या पवित्र वास्तूचा ताजातवाना चेहरा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावा आणि नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेल्या श्री शिवाजी मंदिरचे नवे रुपडे नाट्यरसिकांना बघता यावे, या मनीषेने आम्ही २७ एप्रिल रोजी, श्री शिवाजी मंदिरची भेट घेतली आणि ही ‘Exclusive’ भेट आम्ही व्हिडिओ स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. २७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून नाट्यगृहातील तिकीट खिडकीवर बुकिंग सुरू करण्यात आले. प्रेक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. लोक नाटकांचे फलक वाचून जात होते, तिकीट खिडकीवर चौकशी करत होते,…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवलीतर्फे आयोजित ‘सुवर्ण कलश २०२२’ या राज्यस्तरीय खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २२ एप्रिल रोजी दणक्यात पार पडली. या अंतिम फेरीत दाखल झालेल्या स्पर्धक संस्था आणि त्यांनी सादर केलेल्या एकांकिकांची यादी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. हा माहिती देणारा लेख जर तुम्ही वाचला नसेल तर पुढील लिंकवर नक्की वाचा. सुवर्ण कलश २०२२ अंतिम फेरी — राज्यस्तरीय खुली मराठी एकांकिका स्पर्धा आपण नाटकांवर जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम आपण या विविध नाट्यकृतींवर आधारित स्पर्धांवरही केलं पाहिजे. विश्वास ठेवा! या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी असते. अंतिम फेरीत स्पर्धक संस्थांमध्ये चुरशीचा सामना असतो. प्रयोगाआधीची स्पर्धकांच्या मानतील हुरहूर,…
[Update: ३० मे, २०२२] राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. निकाल जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर! सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलेल्या घोषणेनुसार हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक ६ मे रोजी १०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताचे औचित्य साधून कोल्हापूर येथे या स्पर्धा घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली होती. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतींना नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य व राजर्षी शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी या निमित्ताने कोल्हापूर मधील संगीतसूर्य…
एकीकडे ‘मानवता हाच खरा धर्म’ असे सुविचार गिरवणारा माणूस दुसरीकडे ‘तुझं आडनाव काय?’ या प्रश्नात नेमकं कुठलं उत्तर शोधत असतो? धर्म मोठा की माणूस मोठा? मंदिरात जातो तो हिंदू, मशीदीत जातो तो मुस्लिम, गुरुद्वारेत जातो तो शीख मग या सगळ्यात माणूस कुठे राहिला? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवून देणारं आजच्या काळातलं सुज्ञ नाटक म्हणजे सुनील हरिश्चंद्र लिखित-दिग्दर्शित ‘मोस्ट वेलकम’! मोस्ट वेलकम हे फक्त एक नाटक नसून आजवर उगीचच गुंता होऊन बसलेल्या आणि क्लिष्ट भासू लागलेल्या ‘मानवते’च्या व्याख्येला नव्याने प्रकाशात आणणारं एक वादळ आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हे नाटक बघून त्यातून सुयोग्य बोध घेणं ही आजच्या काळाची गरज आहे.…
Marathi Natak Free Tickets Giveaway पहिल्या Giveaway ला मिळालेल्या यशानंतर आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत GIVEAWAY!!! आम्ही एका नाटकाची दोन तिकिटे जिंकण्याची तुम्हाला संधी देणार आहोत. या Giveaway साठी निवडलेले नाटक आहे संतोष पवार लिखित-दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’. या नाटकासंबंधी संक्षिप्त व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा! हीच तर फॅमिलीची गंमत आहे [Review] https://www.youtube.com/watch?v=UEMH-Lrfmmg Giveaway मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा. ह्या Giveaway मध्ये सहभागी कसे व्हाल? वरील लिंकवर नमूद केलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला जे नाट्यगृह आणि वेळ सोयीचे वाटेल त्या पर्यायावरील बटनवर क्लिक करून तुम्ही स्पर्धेत प्रवेश घेऊ शकता. पुढील स्क्रीनवर तुमचा ई-मेल,…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २२ एप्रिल रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे पार पडणार आहे. अंतिम फेरीत दाखल झालेल्या संस्था आणि एकांकिका पुढीलप्रमाणे आहेत. म्हॅsss (सृजन द क्रिएशन) ‘म्हॅsss’ ही अनेक वर्षांपूर्वी साधारण ४०, ४५ वर्षांपूर्वी कै. रमेश पवार ह्यांनी लिहिलेली एकांकिका. एकेकाळी अशोक सराफ यांनीही ही एकांकिका सादर केली आहे. म्हॅsss ह्या एकांकिकेत अभिनयाचे सर्व प्रकार समाविष्ट झालेले आहेत आणि नटांसाठी एक प्रचंड मोठा व्यायाम असलेली ही एकांकिका आहे. तर ह्या वेळेला ‘सृजन द क्रिएशन’तर्फे ही एकांकिका पहिल्यांदा २ मुली वनमाला वेंदे आणि ऐश्वर्या परशुरामे सादर…
‘अहो मुंबई कोणाची…आपलीच ना, जर ती आपली आहे तर तिची काळजी घ्या…. नाहीतर आपल्या निष्काळजीपणामुळे या मुंबईची ‘तुंबई’ होईल’, असं म्हणत ‘तुंबई’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे. ‘आमची मुंबई’च्या सद्य परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारं आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पालघर, ठाणे, रायगडमधून ‘तृतीय पारितोषिक’ विजेतं हे नाटक आज प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होताना दिसतंय. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल प्रस्तुत चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि गणेश जगताप दिग्दर्शित ‘तुंबई’ या नाटकात अगदी हसत खेळत काही गंभीर आणि आवश्यक विषयांना हात घातला जाणार आहे. तुंबई नाटकाचे दिग्दर्शक गणेश जगताप या नाटकाबद्दल सांगतात की, ‘मुळात या मुंबईवर आपल्या सगळ्यांचं प्रेम…
नाटकात मुरलेला एखादा दर्दी रंगकर्मी असो वा नाटकाचा कट्टर प्रेक्षक, त्याला उभ्या आयुष्यात पुढीलपैकी एखाद्या तरी वर्गात मोडणारी सोंगं भेटतातच! पहिला वर्ग अशा लोकांचा ज्यांना नाट्यगृहात जाऊन नाटक बघायला लाज वाटते, पण तीच लोकं सिनेमागृहात तद्दन टुक्कार सिनेमे अगदी अभिमानाने बघून येतात. दुसरा वर्ग अशा लोकांचा जे भाषेचं दुखणं पुढे करतात. इतकं ‘High Level’ मराठी कोणाला येतं… मला ‘Bounce’ जाणार रे! धाडस नाही होत नाटक बघायचं, असं फुशारक्या मारत सांगणारे हे लोक घरी बसून अगदी श्रीलंकन गाण्यांनाही लाखो-करोडो ‘Views’ देतात YouTube वर! जणू काही मराठी नाही तर कुठली तरी परप्रांतीय भाषाच वापरतात नाटकात आणि तिसरी व सगळ्यात महत्वाची श्रेणी… ‘तू…
२०१९ मध्ये श्रेयसी दुसे, पार्थ टाकळकर आणि अद्वैत कुलकर्णी ‘रंगरेज’ची स्थापना यांनी केली होती. रंगरेज हे एक मनोरंजन गृह असून विविध कलांचा सराव करणारे काही विद्यार्थी ही संस्था चालवतात. आमच्यासारख्या अधिक निर्माते आणि कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे, असे पार्थ टाकळकर यांनी रंगभूमी.com शी बोलताना सांगितले. ३ एप्रिल, २०२२ रोजी ‘रंगरेज’तर्फे एक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, जिथे फिरोदिया करंडक २०२२ मधील दोन विजेत्या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे वेळ: ३ एप्रिल, रात्रौ ९ वाजता तसेच रंगरेजतर्फे सर्व प्रेक्षकांना मोफत अल्पोपहारही देण्यात येणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमात सादर होणाऱ्या एकांकिका भूत मारीच्या एकांकिका भूत…
इमर्सिव्ह सेन्सरी अनुभव म्हणजे प्रायोगिक थिएटरचा एक प्रकार जिथे प्रेक्षक केवळ प्रेक्षक नसतात, तर प्रयोगचा सक्रिय भाग असतात. अशाच इमर्सिव्ह सेन्सरी अनुभव देणारी नाटकं घडवणारी भारतातील एक प्रमुख कंपनी म्हणजे ‘रंगाई थिएटर कंपनी’! या कंपनीला त्यांच्या ‘द डार्करूम’ नावाच्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये प्रेक्षक आणि प्रसार माध्यांकडून भरपूर प्रशंसा मिळाली. त्यामुळे त्यांनी रंगाईच्या निर्मितीमध्ये पर्यायी घटक समाविष्ट केले आणि ‘द डार्करूम 2.0’ प्रदर्शित केले. त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच ऐन १९९ वा प्रयोग सादर झाल्यानंतर कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले आणि सर्व काही बदलले. संपूर्ण जगाप्रमाणेच, परफॉर्मिंग आर्ट डोमेनला कोविडमुळे मोठा फटका बसला. रंगाई थिएटर कंपनीचे प्रयोग इंटीमेट पद्धतीचे असल्यामुळे आणि प्रेक्षकांचा…
कोविडच्या पार्श्वभूमीवर रंगभूमी दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळासाठी स्थगित झाली आणि कट्टर नाट्यरसिक नवनवीन नाट्यानुभव अनुभवण्यासाठी आसुसले. पण आज चित्र वेगळं आहे. आज रंगभूमी पुन्हा एकदा नवा श्वास घेऊ लागली आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतीक्षेस न्याय देतील अशा सुखद आणि दर्जेदार नाट्यकलाकृतीही जन्मास येत आहेत. रंगभूमी.com ची संपूर्ण टीमदेखील सर्व नाटकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तत्पर आहेच! तुम्ही आमच्या या प्रयत्नांना कमालीची साथ देताय हेही तितकंच खरं! पण, हे समीकरण तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्या नाटकाबद्दलची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पुन्हा पोहोचेल आणि आज तेच घडलेलं आहे. ‘सारखं काहीतरी होतंय!’ या ताज्यातवान्या नाटकाबद्दल आपले प्रिय वाचक श्री. विजयकुमार अणावकर यांनी…