Search for:
साहित्य सहवास

माझ्या आठवणीतील नाटक — हिमालयाची सावली

Pinterest LinkedIn Tumblr

रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पाहिले.  मराठी रंगभूमीवरील एक अजरामर अभिजात कलाकृती म्हणून ‘हिमालयाची सावली’ हे नाटक कायम स्मरणात राहील. १९७२ नंतर सत्तेचाळीस वर्षांनी ह्या अभिजात कलाकृतीचे शिवधनुष्य समर्थपणे पेलून राजेश देशपांडेनी तर कमालच केली आहे. हिमालयाची सावलीचे कथानक साधारण १९२० सालातील, रंगमंचावर तो कालावधी प्रभावीपणे साकारण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार यांच्या बरोबरच कलाकारही यशस्वी झाले आहेत. आयुष्यभर समाजसेवेचे कार्य करणारे ‘नानासाहेब’ आणि त्यांचा संसार निगुतीने जपणारी ‘बयो’ यांची गोष्ट सांगाणारे हे नाटक आहे.  समाजसेवेच कार्य आणि समाजाचा संसार कोणी समजूत घेत नाही यांची खंत नानासाहेबांना कायम असते. आपल्या कुटुंबीयांना आपण बाहेर काय करत आहोत हे कळत नाही, यांची बोच त्यांना सतत असते. समाजाचा संसार करताना कुटुंबियांची परवड ही होणारच हे समजून घ्यायला हवे ही त्यांची इच्छा असते, पण ते कोणीही समजून घेत नाही.   नानासाहेबांची भूमिका शरद पोंक्षे यांनी अप्रतिम साकारली आहे. या भूमिकेत कमीत कमी शब्दात ते जास्तीत जास्त व्यक्त होताना दिसतात.  समाजकार्याला वाहून घेतलेल्या नानासाहेबांचा संसार कणखरपणे सांभाळणारी आणि मुलांच्या मायेने भाऊक होऊन देखील वेळप्रसंगी निर्णय घेताना नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली ‘बयो’ ही व्यक्तिरेखा शृजा प्रभुदेसाई यांनी ज्या तडफेने साकारली आहे, त्याला तोड नाही. त्यामुळे नाटकातील ‘बयो’ ही व्यक्तिरेखा खूपच प्रभावी ठरली आहे. अलीकडच्या काळात रंगमंचावर इतक्या तन्मयतेने भूमिका कोणीही साकारली असेल, असे वाटत नाही.

नानासाहेब आणि बयो या व्यक्तिरेखा प्रभावी ठरत असताना या नाटकातील सर्वच कलाकारांनी तोलामोलाची कामगिरी केली आहे. जयंत घाटे, ॐकार कर्वे, विघ्नेश जोशी, कृष्णा राजशेखर, ऋतुजा चिपडे आणि पंकज खामकर यांनी आपल्या भूमिका समरसून पार पाडल्या आहेत. ही अभिजात कलाकृती प्रेक्षकांना तीन अंकातच पहायला मिळणे हे खरतर स्मरणरंजनच, त्याबद्दल निर्माता आणि दिग्दर्शकांचे विशेष आभार मानायला हवेत.
पडदा पडल्यानंतर देखील प्रेक्षक नाटकात गुंतून पडताना दिसतात. नाटक पाहून जाताना प्रेक्षकांनी काही तरी संचित घेऊन जावं, ही नाटकाची इच्छा इथे पूर्ण होते. जुन्या पिढीने पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा आणि नव्या पिढीतील तरुणाईने आवर्जून पहावे, अशी अभिजात कलाकृती असलेले हे नाटक रंगभूमीवरील माईलस्टोन ठरलं आहे.

vijaykumar anavkar

विजयकुमार अणावकर

डोंबिवली (पूर्व )

हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.

2 Comments

  1. उत्कृष्ट विवेचन!!
    या कलाकृतींचा आस्वाद मी प्रत्यक्ष घेतला आहे. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक कलाकारांचं निरीक्षण उत्कृष्टपणे येथे प्रकट केल्या बद्दल धन्यवाद!!

  2. Swapna Pednekar Reply

    लेखकाच्या सखोल अभ्यासाची पूर्ती जाणवते. मुद्देसूद मांडणी अणि अप्रतिम लेखन.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.
%d bloggers like this: