Saturday, July 31, 2021

झपूर्झा — १२ नाट्याविष्कारांचा ऑनलाईन सोहळा

- जाहिरात -

ठाण्यातील अजेय संस्था दरवर्षी ‘झपूर्झा‘ नावाचा कार्यक्रम करत असते. गेल्यावर्षी लॉकडाऊन असून सुद्धा सर्वात पहिल्यांदा झपूर्झा ‘वसुधैव कुटुंबकम’ या थीम अंतर्गत १५ ऑगस्ट, २०२० रोजी ऑनलाईन सादर झाला. या वर्षी अजेय संस्था Mix Media Theater अंतर्गत झपूर्झा ‘हसले मनी चांदणे’ या थीमनुसार रविवार, २७ जून, २०२१ रोजी झपूर्झा होणार आहे. याची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन डॉ. क्षितिज कुलकर्णी यांचे असून निर्माता गौरव संभुस आहेत.

झपूर्झाचे हे ९वे गौरवशाली वर्ष. दर वर्षी झपुर्झा नव्या कलाकारांनी, व्यवस्थापनाने, तंत्रज्ञांनी, कल्पनांनी, संहितांनी रीलोड होतो. कल्पना ही माणसाला मिळालेली सुपर पॉवर. ही कल्पना आपल्या प्रत्येकाच्या ओठावर, गालावर हलकं हसू आणतेच आणते. सध्याच्या निराशेच्या वातावरणात हीच सुपर पॉवर वापरून अनेक मुद्दे, विषय हाताळले, तर आपल्या हाती लागणारं चांदणं ह्या वर्षी सादर होणार आहे.

यासाठी टीम online आणि mixmedia अशी दोन माध्यमं वापरून, २७ जूनला कलाकृती Facebook च्या विशेष page वर समोर आणणार आहेत. Mixmedia ही डॉ.क्षितिज कुलकर्णी यांची संकल्पना ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर पहिल्यांदाच वापरली जाणार आहे.

झपूर्झामध्ये यावर्षी सादर होणारे नाट्याविष्कार पुढीलप्रमाणे आहेत.

 • आख्यान १ मायनस – (लेखन/दिग्दर्शन: डॉ.क्षितिज कुलकर्णी)
 • link in bio (माहितीची लिंक माहितीत) – (लेखन/दिग्दर्शन: डॉ.क्षितिज कुलकर्णी)
 • कागदी रहस्य – (लेखन/दिग्दर्शन: डॉ.क्षितिज कुलकर्णी)
 • अ ब क – (लेखन/दिग्दर्शन: डॉ.क्षितिज कुलकर्णी)
 • हॅशटॅग सरबत – (लेखन: डॉ.क्षितिज कुलकर्णी, दिग्दर्शन: हेमांगी कुळकर्णी संभूस)
 • श्रीकांता कमला कांता असं कसं झालं? – (लेखन: साधना पाटील, शुभा खांबेकर, शिल्पा कुलकर्णी, सुवर्णा कांबळे. दिग्दर्शन: साधना पाटील, नलिनी पुजारी)
 • द बीट ऑफ बादलनगर (नृत्य नाट्य) – (लेखक/दिग्दर्शक: कार्तिक हजारे)
 • जगात भारी – (उत्स्फूर्त आविष्कार)
 • टीम धोबीघाट – (लेखन/दिग्दर्शन: अवधूत यरगोळे)
 • ससा कासव आणि announcement – (लेखन/दिग्दर्शन: डॉ.क्षितिज कुलकर्णी)
 • नभ उतरू आलं – (लेखन/दिग्दर्शन: डॉ.क्षितिज कुलकर्णी)
 • रोज मरे त्याला – (लेखन/दिग्दर्शन: डॉ.क्षितिज कुलकर्णी)
- Advertisement -

ही ‘हसले मनी चांदणे’ ह्या theme वर आधारित १२ नाटकं सादर होणार आहेत. भारत तसेच भारताबाहेरील प्रेक्षकही घर बसल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतात. संपूर्ण सोहळ्याचे भारतातील तिकीट शुल्क १००/- आकारण्यात आले आहे.

प्रत्येक नाटकाची घडण, प्रोसेस, त्यातले किस्से, आणि नाटक नक्की काय आहे या पैलूंवर कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, व्यवस्थान ह्यांच्याशी ‘Sunday Live फ्लॅग शो’, ‘Wednesday Live फ्लॅग शो’ या कार्यक्रमांमधून फेसबुक वर अजेय संस्थेच्या zapurza page वर गप्पा सुरु आहेत.

http://Fb.me/zapurza2021

वरील पेजला भेट देऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता. तसेच झपूर्झा २०२१ बघण्यासाठी आपली स्क्रीन आजच बुक करा. तिकट विक्री ची लिंक खाली दिली आहे. तसेच काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.

झपूर्झा ‘हसले मनी चांदणे’ वर्ष ९ वे तिकीट विक्री लिंक
Google Pay, PhonePe, patym no – 9930175527
लिंक – https://www.townscript.com/e/rppev-120303

अवधूत यरगोळे: 8928864171 · कार्तिक हजारे: 9082269538 · साधना पाटील: 9987267953 · हेमांगी कुळकर्णी संभुस: 7208688235

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.