Thursday, November 12, 2020

अभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून!

नक्की वाचा

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

माझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं

आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का...? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे...

राहुल हणमंत शिंदे याचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह Online विक्रीसाठी उपलब्ध!

रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या....

लॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक Online माध्यमातून प्रेक्षकांच्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातीलच एक अभिनव उपक्रम म्हणजे अभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या”!

“नाट्यछटा दिवाकरांच्या” बद्दल काही ठळक मुद्दे

  • हा उपक्रम १५ ऑगस्ट, २०२० ते २९ ऑगस्ट, २०२० दरम्यान अभिनय कल्याण संस्थेच्या YouTube चॅनेलवर सादर होणार आहे. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. https://www.youtube.com/channel/UCRkOzRPXizr6qAkrBAYCn3Q
  • रोज सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
  • नाटक, सिनेमा आणि सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोचलेले २६ कलाकार २६ निवडक नाट्यछटा सादर करणार आहेत.
  • हा संपूर्ण प्रयोग स्वेच्छा मूल्य निधीवर राबवला जाणार आहे. म्हणजेच, आपण आपल्या इच्छे नुसार (ओमकार जाधव) 08551844599 या नंबरवर Google Pay, PhonePe द्वारे अभिनय कल्याण संस्थेला आपले स्वेच्छा मूल्य पाठवू शकता.

उपक्रमाचे वेळापत्रक आणि २६ कलाकारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.


१३ ऑगस्ट रोजी रंगभूमी.कॉम च्या YouTube चॅनेलवर अभिजीत झुंजारराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी गप्पा मारताना “नाट्यछटा दिवाकरांच्या” या उपक्रमाबद्दल, त्यांच्या टीमवर्कबद्दल आणि अभिनय कल्याण संस्थेच्या आगाऊ उपक्रमांबद्दल बरीच माहिती मिळाली. हा मुलाखतीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.

अभिनय कल्याण संस्थेने तमाम प्रेक्षक वर्गाला अतिशय नम्रपणे उपक्रमाची संपूर्ण माहिती देत या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. ते नक्की वाचा!

श्री. शंकर काशिनाथ गर्गे अर्थात दिवाकर.
शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकर या टोपणनावाने नाट्यछटा लिहित. ज्या नाट्य वर्तुळात सर्वश्रुत आहेत. दिवाकरांचे वाचन अफाट होते. वाचना विषयी सन ३१ डिसेंबर १९१० साली त्यांच्या रोजनिशीत पुढील शेरा आढळतो. ‘यंदा वाचन चांगलेच झाले. एकूण १७७५२ पृष्ठे वाचली.’ यावरुन आपल्याला त्यांच्या विपुल वाचन संपदेचा विस्तृत अंदाज येतो. या वाचलेल्या व अभ्यासलेल्या पुस्तकांच्या यादीत शेक्सपिअर, स्कॉट, मेरी कॉरेली, कॉनंडाईल, डेन्री वुड, डिक्वेन्सी, टेनिसन, वुइलकॉक्स, मोलीयर यांच सोबत कित्येक मराठी चरित्र, नाटकं आणि कादंबऱ्याही आहेत.
या सगळ्या लेखकांचा, केलेल्या वाचनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते लिखाण करण्यास प्रवृत्त झाले. याचं प्रेरणेतून दिवाकर यांनी आपल्या लेखनाची सुरवात २७ मार्च १९११ रोजी ‘यॉर्कशायर ट्रेजिडी’ या इंग्रजी नाटकावरून बेतलेल्या ‘रगेल रंगराव’ या नाटकाने केली. लेखनाचा सुरळीत प्रवास सुरु असताना त्यांची दृष्टी कमकुवत झाली. काम करण्यास ‘अनफिट’ असल्याचे पत्र त्यांना कचेरीतून मिळाले. त्यांची नोकरी गेली. पण ते थांबले नाहीत. याही परिस्थितीत ‘ब्राउनिंग’ या कवीच्या काव्य लेखना वरून त्यांनी काही मोनोलॉग्ज लिहिले. ते मोनोलॉग्ज वृत्तपत्राच्या पदाधीकाऱ्यांना वाचून दाखवले. वाचता क्षणीच ते आवडले आणि दिनांक १५ मार्च १९१३ साली हे मोनोलॉग्ज अर्थात दिवाकरांच्या नाट्यछटा केसरी सारख्या महत्वाच्या वृत्तपत्रातून घरा घरात पोचल्या. या नाट्यछटा इतका काळ लोटूनही कलाकारांना कराव्याशा वाटतात. आजही त्यावर प्रयोग होतात. हेच दिवाकरांच यश आहे. पुढे “दिवाकरांच्या नाट्यछटा” या नावाने सगळ्या नाट्यछटा पुस्तक रुपात संपादित सुद्धा झाल्या.

दिवाकरांच्या नाट्यछटांच महत्व जाणून आम्ही त्या आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा घाट घातला आहे. आम्ही निवडलेले २६ कलाकार २६ निवडक नाट्यछटा आपल्या समोर डिजिटल माध्यमातून सादर करणार आहोत. ज्या आम्ही स्वातंत्र्यदिनाच औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट २०२० ते दिनांक २९ ऑगस्ट २०२० दरम्यान https://www.youtube.com/c/Abhinaykalyan या you tube channel वर रोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करणार आहोत. निवडलेले हे २६ कलाकार नाटक, सिनेमा आणि सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोचलेले आपले लाडके कलाकार आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थी lock down चा हा कठीण काळ सुसह्य केला. या मातब्बर कलाकारां करता आणि आपल्या सारख्या रंगभूमी आणि कलाकारांवर मनापासून प्रेम करणाऱ्या दर्दी रसिक प्रेक्षकां करता नव्या जुन्याचा हा अनोखा संगम निश्चितच कुतूहलाचा विषय असेल. या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच माफक अपेक्षा.
हा संपूर्ण प्रयोग स्वेच्छा मूल्य निधीवर राबवला जाणार आहे. म्हणजेच, आपण आपल्या इच्छे नुसार (ओमकार जाधव) 08551844599 या नंबरवर Google Pay, PhonePe द्वारे आम्हाला आपले स्वेच्छा मूल्य पाठवू शकता.

आपली,
अभिनय, कल्याण.
०९९६७०८५५०५

अशाच नवनवीन उपक्रमांबद्दल रंगभूमी.com तुम्हाला नेहमी माहिती देत राहील. त्यामुळेच आम्हाला रंगभूमी.com ला Like, Follow आणि Subscribe करायला विसरू नका.

- Advertisement -

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

TPL 2020 Online नाट्यमहोत्सव – तब्बल ४०० लोकांनी घर बसल्या बघितली खुमासदार नाटकं!

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे...

थिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)

लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी...

रातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या "रातराणी" या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात...

Nope! You cannot copy the content on this page, sorry.