Search for:
News

OMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव

Pinterest LinkedIn Tumblr

लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक रंगभूमीवरील नाटक पाहण्यासाठी आसूसलेले आहेत. नाटकाचे प्रयोग कधी सुरू होणार ? ह्याची उत्सुकता प्रत्येक नाट्यरसिकाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या विळख्यात असलेल्या मुंबई पुण्यात तरी नाटकांचे प्रयोग इतक्यात सुरू होणे कठीण आहे. अशा संकट काळात प्रेक्षकांना थेट रंगभूमीपर्यंत पोहोचता येत नसल्याने प्रत्यक्ष रंगभूमीच आपल्या घरोघरी अवतरणार आहे.

सुनील बर्वे, पौर्णिमा मनोहर आणि वाईड विंग्स मिडीया यांची संकल्पना असलेल्या OMT अर्थात ‘Online माझं Theatre‘ ह्या विशेष कार्यक्रमाची नुकतीच OMT च्या अधिकृत फेसबुक पेजवर घोषणा करण्यात आली.

त्याविषयी सांगताना टीमतर्फे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. ह्यात एकूण वीस कलाकारांच्या चार टीम्सने सहभाग घेतला असून प्रत्येक टिमचा एक कॅप्टन असणार आहे. कॅप्टन धरून पाच जणांची एक टीम असेल. त्यासाठी कॅप्टन म्हणून मिलींद फाटक, रसिका आगाशे, संदीप पाठक आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या हाती धुरा सोपवण्यात आली आहे. दिनांक २६ जून २०२० रोजी झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये संवाद साधताना ही माहिती देण्यात आली.

मराठी नाट्य-सिनेमा-मालिका क्षेत्रातील तब्बल २० कलाकारांचा हा Online नाट्यानुभव असणार आहे. ह्यात दर आठवड्याला शनिवार आणि रविवार भारतीय वेळेनुसार रात्री ०९:०० ते १०:०० हे Online Theatre आपल्या घरी येणार आहे. शनिवार दोन टीम तर रविवारी उरलेल्या दोन टीम दिलेल्या विषयावर प्रत्येकी चार मिनिटे सादरीकरण करतील. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ह्याचे परीक्षक. कार्यक्रमासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि थेट अमेरीकेहून अभिनेत्री अश्विनी भावे परीक्षण करणार आहेत. परीक्षकांनी प्रत्येक सदस्याला दिलेले गुण त्याच्या टिमसाठी मोजले जाणार आहे. एकूण चार आठवडे चालणाऱ्या ह्या Online Theatre ची सुरूवात येत्या ४ जुलै २०२० पासून होणार आहे. हा कार्यक्रम सशुल्क असून त्याबद्दलची अधिक माहिती अधिकृतरीत्या देण्यात येईल. चौथ्या आठवड्यात कार्यक्रमाचा Final Round होईल, अशी माहिती कालच्या फेसबुक लाईव्हमध्ये देण्यात आली आहे.

ह्या स्पर्धेत जिंकणाऱ्या टीमला रूपये एक लाख तर रनर अप टीमला रूपये पंच्याहत्तर हजार पारीतोषिक म्हणून मिळेल. सोबतच सातत्याने उत्तम सादरीकरण करणाऱ्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला मॅन ऑर वुमन ऑफ दी सिझनचा किताब व आकर्षक बक्षीस मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील नक्कीच हा एक वेगळा प्रयत्न आहे. ज्याची उत्सुकता आता घरी बसलेल्या नाट्यरसिकांना नक्कीच असेल. त्यामुळे जराही वेळ न दवडता फेसबुक वरील Online माझं Theatre पेजला लवकरात लवकर Like, Follow करा आणि या खुमासदार स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तयार व्हा!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.