Search for:
News

ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचा गरजू रंगकर्मींना मदतीचा हात!

Pinterest LinkedIn Tumblr

कोरोनारूपी संकटातून आपणा सर्वांना बाहेर पडण्यास अजून किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी निश्चितच जाईल. तसंच, परिस्थिती पूर्णतः स्थिरस्थावर होऊन प्रेक्षकवर्ग पुन्हा नाट्यगृहामध्ये प्रवेश करण्यास कमीत कमी ५ ते ६ महिने लागतील. पण तोपर्यंत, रंगभूमीच्या जोरावर रोजगारी मिळवून दैनंदिन व्यवहार चालवणाऱ्या गरजू कलाकारांना होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवून प्रशांत दामले, विक्रम गोखले, प्रसाद कांबळी हे आणि असे बरेच ज्येष्ठ रंगकर्मी पुढे सरसावले. आता या यादीमध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचे!

अश्विनी भावे यांनी WhatsApp वरील एका उपक्रमांतर्गत गरजू रंगकर्मींना ५ लाख रुपयांची मदत केली आहे आणि त्या पुढील तीन महिने ५ लाख रुपये मदत निधी म्हणून देणार आहेत. म्हणजेच एकूण २० लाख रुपये देऊन त्यांनी बऱ्याच रंगकर्मींना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याची मोठी कामगिरी पार पडली आहे.

अश्विनी भावे यांच्या योगदानाबद्दल आपले लाडके अभिनेते श्री. प्रशांत दामले यांनीदेखील Facebook च्या माध्यमातून पुढील शब्दात त्यांचे आभार मानले आहेत.

आजच्या काळात मदत ही संकल्पना म्हणजे माझा काय फायदा ? तो होणार असेल तर देईन अशी प्रवृत्ती असताना केवळ एका व्हाट्सअप्प समूहाच्या उपक्रमावर आणि त्या समूहातील व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवून आपली मदत योग्य त्या गरजू लोकांपर्यंत निश्चितच मिळेल ह्या खात्रीने इतकी मोठी रक्कम देऊन उपक्रमाला पाठबळ देणं ही खरंच कौतुकाच्या पलीकडची गोष्ट आहे… आणि अश्यावेळी आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे, आणि आपण सर्व मिळून ती जबाबदारी नक्की निभावू हा विश्वास आहे.

*एक हात आपुलकीचा, विश्वासाचा आपल्या माणसांना सावरण्याचा*

मराठी नाटक समूहाच्या ह्या प्रामाणिक उद्देशावर आणि केलेल्या मदतनिधीचा थेट विनियोग संबंधित गरजू रंगकर्मीनाच मिळेल ह्या विश्वासाने *मराठी नाट्य, चित्रपट कलावंत सौ. अश्विनी भावे* ह्यांनी मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाला रुपये 5 लक्ष आर्थिक पाठबळ दिलेले आहे, आणि ह्यापुढे देखील पुढचे 3 महिने अश्याच पद्धतीने मदत करण्याचे ठरवले आहे . म्हणजेच एकूण रुपये 20 लक्ष मदत करण्याचे मान्य केले आहे. 

समस्त मराठी नाटक समूह आणि पडद्यामागील 200 कलाकार सौ. अश्विनी भावे ह्यांचे ऋणी आहेत.  🌹🌹

मराठी नाटक समूह

WhatsApp वरील उपक्रमावर कुठलीही शंका न घेता त्यांनी सढळ हातांनी केलेले हे योगदान खरंच खूप कौतुकास्पद आहे! त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन अधिकाधिक रसिक प्रेक्षक मराठी नाटक समूहाच्या WhatsApp वरील उपक्रमांतर्गत कलाकारांच्या मदतीसाठी पुढे येतील अशी आम्हाला आशा आहे.

[Photo via Facebook]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.