Search for:
News

Online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम निकालाच्या तारखेत बदल!

Pinterest LinkedIn Tumblr

काही दिवसांपूर्वी रंगभूमी.com वेबसाईटवर आम्ही Online एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. वेबसाईट सुरू होऊन एक महिनाही झालेला नसताना स्पर्धेला इतका उदंड प्रतिसाद मिळवून दिल्याबद्दल आम्ही रंगभूमी.com च्या वाचकांचे आभारी आहोत. Online एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जो भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळाला त्या प्रतिसादामुळेच स्पर्धेचा निकाल घोषित करण्यासाठी परीक्षकांना थोडा जास्त अवधी देणे आम्हाला हिताचे वाटले. म्हणूनच, स्पर्धेचा निकाल आम्ही थोडा पुढे ढकलत आहोत. या स्पर्धेचा निकाल आता १ मे, २०२० रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी सायंकाळी ७ वाजता रंगभूमी.com च्या YouTube चॅनेल वर जाहीर होणार आहे. तरीही निकाल बघण्यासाठी रंगभूमी.com च्या YouTube चॅनेल वर आत्ताच Subscribe करा.

अजून एक महत्वाची घोषणा अशी आहे की स्पर्धेत प्रौढवर्गामध्ये भरपूर प्रवेश अर्ज आले. परंतु बालवर्गामध्ये जास्त प्रवेश अर्ज आले नाहीत. तरीही लहान मुलांच्या मेहनतीचा मान ठेवत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बालवर्गाची स्पर्धा रद्द न करता आम्ही दोन ऐवजी एकच पारितोषिक घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, रंगभूमी.com वरील ही पहिलीच स्पर्धा असल्याने आम्ही फक्त विजेत्यांचेच नाही तर परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या सर्व स्पर्धकांचे व्हिडिओज रंगभूमी.com च्या YouTube चॅनेलवर प्रकाशित करायचे ठरविले आहे.

अभिनयाशी संबंधित पुढील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी रंगभूमी.com शी जोडलेले रहा आणि त्यासाठीच तुम्ही वेबसाईटवर तुमच्या ई-मेल द्वारे Subscribe करणे गरजेचे आहे.

Join 25 other subscribers

चला तर मग भेटू महाराष्ट्र दिनी सायंकाळी ७ वाजता अंतिम निकालासोबत! सर्व स्पर्धकांना निकालासाठी शुभेच्छा!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.