Saturday, October 24, 2020

नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग २

नक्की वाचा

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

माझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं

आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का...? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे...

राहुल हणमंत शिंदे याचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह Online विक्रीसाठी उपलब्ध!

रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या....

या ४ अंकी लेखातील पहिला अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा! – भाग १

मन कासावीस होऊ लागले होते. म्हणून आता कसेबसे नाट्यगृहाच्या खुर्चीतून उठून सवयीप्रमाणे मी विंगेत आलो. आणि पाहतो तर काय ? तिथून रंगमंचावर फक्त एक स्पॉट त्या कलाकाराच्या हृदयाला अधोरेखित करीत होता. सबंध मंचावर नेपथ्य नसूनही त्या हृदयानेच सर्व नाट्यावकाश व्यापून टाकला होता. विंगेत एरवी असणारी धावपळ नव्हती. हीच ती विंग, जिथून वाडा चिरेबंदीच्या नेपथ्याला स्पर्श करून नाटकातील कुटुंबाचा भाग झाल्यासारखे मी वावरलो होतो. हीच ती विंग, जिथे बसून पहिल्यांदाच बॅकस्टेजहून ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकाचा काही प्रवेश पाहिले होता. हीच ती विंग, जिथून युगान्तच्या शेवटच्या प्रयोगानंतर वाडा पाहताना मी ढसाढसा अश्रू गाळले होते. हीच ती विंग, जिथे जेष्ठ पार्श्वसंगीतकार अरूण कानविंदे ह्यांच्या मागोमाग आगंतुकासारखा येऊन मी दिगंबर नाईकचं एक नाटक पाहीलं. इथे उभं राहून ‘हॅम्लेट’ नाटकाच्या नेपथ्याची भव्यता याची देही याची डोळा मी पाहिली होती. किती आठवणी आहेत साध्या विंगेच्याही. अर्थात कलाकारासाठी विंग ‘साधी’ मुळीच नसते.

आठवणींमध्ये इतका गुरफटलो की, मंचावरून ते तडफडणारं हृदय कधी दिसेनासं झालं कळलच नाही. मी विंगेच्या आतल्या बाजूने मेकपरूमकडे जायला निघालो. दरवाजा उघडून रंगमंचाच्या मागील बाजूस प्रवेश केला. तर एखाद्या ब्लॅक ॲंड व्हाईट काळात आलोय असा भास झाला आणि अचानकच सगळे रंग ह्या जगातून नाहीसे झाल्यासारखे वाटू लागले. ते हृदय डोळ्यांना आता दिसत नव्हते; पण तरीही त्याची स्पंदने मला जाणवतं होती. त्याला शोधता शोधता उजव्या हाताला कपडेपटाच्या खोलीकडे सहज लक्ष गेले. तर सर्वच्या सर्व पेट्या तशाच उघड्या होत्या. त्यातील कपडे इतरत्र ठेवलेले दिसले. नाटकाचा प्रयोग संपला की, खरंतर कपडे जमा करून त्यांची योग्य पद्धतीने घडी घालून पेट्यांमध्ये ठेवताना मी अनेकदा काही काका-मावशींना पाहीलं होतं. प्रयोग झाला की लोकं कलाकारांना भेटायला गर्दी करतात तेव्हा हीच मंडळी पटापट आपले काम उरकर असतात. प्रयोग संपला रे संपला की लगेच कपडे घेऊन नीटनेटक्या जोड्या करून, त्यांची अलगद घडी घालून त्या पेटीत ते पटापट ठेवले जातात. पण आज असे का झाले ? हे सगळे कपडे असेच अस्ताव्यस्त का पडले आहेत ? आता मात्र न राहुन मी कपडेपटात प्रवेश केला होताच. एकेक कपडा हातात घेत मी त्याचा स्पर्श माझ्या मनात साठवू लागलो. त्या प्रत्येक स्पर्शात मला माझी एकेक आठवण सापडत होती. मला ‘मी रेवती देशपांडे’ नाटकामधील मोहन जोशींची ती शेवटच्या प्रवेशातली हिरवी साडी सापडली, त्यात रेवतीच्या रूपात त्यांनी केलेला प्रवेश असा लख्ख डोळ्यांसमोर उभा राहिला. पेटीबाहेर एका बाजूला एक पाईप दिसला. त्यातून येणारा गंध नाकाने अचूक हेरला होता. तो पाईप हातात घेताच मला ‘अश्रूंची झाली फुले’मधील प्रो. विद्यानंद त्यांच्या विशिष्ट लकबीने हातात पाईप घेतलेले दिसू लागले. दुसरी पेटी बंद होती पण त्यातून एका झग्याचा काही भाग बाहेर लोंबकळत होता. मी त्वरेने ती पेटी उघडली तर त्यातील तो छानसा झगा ‘हॅम्लेट’मधील गर्ट्रूडचा होता. हाच झगा घालून ती अगदी एखाद्या महाराणीला शोभेल अशी वावरायची. त्या पेटीत कोणीतरी एक चष्मा असाच ठेवून गेलं होतं. मला तो चष्मा थोडा वेगळा वाटला. त्याला हातात घेऊन मी त्यातून पाहू लागलो तर ‘कुसुम मनोहर लेले’मधील मनोहर लेले त्याच्या त्या कपटी हास्यासोबत मला त्या फ्रेममधून दिसत होता. मुलाच्या वियोगाने व्याकूळ झालेल्या कुसुमच्या दु:खाचा आक्रोश आठवून मी पटकन तो चष्मा खाली ठेवून दिला. त्या मागच्याच एका टेबलवर आई रेणुकेचा एक मुखवटा ठेवलेला होता. घरात स्थापन केलेल्या ह्याच मुखवट्याने ‘सोयरे सकळ’ नाटकातील क्षीरसागरांच्या वाड्याला देवस्थानाचे महत्त्व मिळवून दिले होते.

ह्या आणि अशा अनेक गोष्टी पाहताना नाटकांच्या ज्या-त्या प्रयोगातील माझ्या पुरत्याच मी जमवलेल्या असंख्य आठवणी डोळ्यांसमोर येत होत्या. मला राहून राहून एक गोष्ट कळेना की, विविध नाटकातील हे सगळं एकाच ठिकाणी का दिसतय ? हा माझा भास आहे की मनाच्या तळाशी झालेला विस्फोट ? की सत्य आणि इच्छा यांतील द्वंद्वाने उभे राहिलेले मृगजळ ? काहीच कळेनासे झाले होते. शरीरातून आत्मा निघून जावा तसे अचानक आयुष्यातून रंग परागंदा झाले होते. आई रेणुकेच्या त्या मुखवट्यासमोर उभा राहून मी एकटक ती जीवघेणी शांतता भंग व्हावी, यासाठी मनोमन प्रार्थना करत होतो. तू आई आहेस, तू आमची जन्मदाती आहेस, तूच आमची रक्षणकर्ती आहेस, त्यामुळे आता तूच ह्या संकटातून रंगभूमीला म्हणजे खरंतर तुझ्याच एका रूपाला मोकळा श्वास घेऊ दे. हीच प्रार्थना त्या शांततेत एकाग्रचित्ताने करत असतानाच काहीतरी खाड्कन पडल्याचा आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली…

क्रमशः पुढे…

Podcast Episode

Ep. 2: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग २

- Advertisement -

More articles

4 COMMENTS

  1. Khup chan lihilay Abhi. Tuzyasobat sampurn theater firun aalyasarkhe vatale. Kharch sadhyachya lockdown chya period madhye natak permi chya manachi kay avshta asel . Pn aapla Bharat Desh Corona la harvun lavkarch parishtiti badalel n punha sagale kase purvvat hoel. Tuzya pudhil vatchalusathi Shubheccha 👍👍…….Tai

  2. खूपच सूंदर शब्दात वर्णन केलय.. प्रेक्षक गृहात बसून नाटकं खूप पाहिली, पण त्या नाटका मगचं खरं सत्य, ती मेहनत, या लिखाणातून छान स्पष्ट झाली..👌👌👌👍

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

TPL 2020 Online नाट्यमहोत्सव – तब्बल ४०० लोकांनी घर बसल्या बघितली खुमासदार नाटकं!

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे...

थिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)

लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी...

रातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या "रातराणी" या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात...

Nope! You cannot copy the content on this page, sorry.

%d bloggers like this: