Search for:
Opinion

नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग १

Pinterest LinkedIn Tumblr

एक गोष्ट राहून राहून मनाला सलतेय. का कोणास कुणास ठावूक पण ती बोलून दाखवण्याचे धाडस माझ्यात नाहीये. सद्यस्थिती पाहता ती जर भावनेच्या भरात बोलून बसलो तर मात्र टिकेला सामोरे जावे लागेल, अशी भिती मनात गेले कित्येक दिवस घर करून आहे. आज कोरोनाच्या प्रादुर्भावाने थांबलेल्या माझ्या नेहमीच्या जीवनचक्राला तब्बल दिड ते पावणेदोन महिने झाले. ह्या दिवसांत कोरोना वाढतोय, दिवसागणिक संख्या वाढतीच दिसते आहे. पण अशा वेळी थांबलेल्या जीवनचक्रात मला दिसतो नाटकाचा पडलेला पडदा.

लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे आणि तुला नाटक सुचतय ? हा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर तो योग्यच आहे. कारण आपल्या जीवनापुढे काहीही महत्त्वाचे नाही. पण गेले कित्येक रात्री मला वारंवार स्वप्नात हा नाटकाचा पडलेला पडदा, तो नकोसा वाटणारा अंधार सतत त्रास देतो आहे. असं वाटतं कि, बहुतेक ब्लॅकआऊट झालाय आणि पुढचा प्रवेश आता काहीच सेकंदात सुरू होईल व आपोआप रंगमंच उजळून निघेल. कुठून तरी एक धूसर प्रकाश किंवा मंद ध्वनी ऐकू येईल ज्यायोगे आता रंगमंचावर कोणाचा तरी प्रवेश होणार, असे वाटते. पण हा अंधार काही केल्या जात नाहीये. बातम्यांमधून कोरोनाचे रोजचे वाढते आकडे पाहताना हा अंधार अधिकाधिक गडद होतोय, असे भय मनाला सतावत आहे.

एक गोष्ट मनाला सलतेय ती अशी कि, एखाद्या नाटकाला जायचं म्हणजे माझं खूप प्लानिंग वगैरे असतं. उगाच कसंतरी घाईघाईने जाऊन नाटक बघण्यात मला मनासारखा आनंद मिळत नाही. असंच त्या दिवशी (१३ मार्च २०२०) प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात एका नाटकाचा प्रयोग होता. शुक्रवार, त्यात संपूर्ण दिवस कॉलेज, त्यामुळे ह्यावेळी काही जायला मिळायचे नाही, असेच ठरवून मनाची समजून काढली. पण सुदैवाने कॉलेजमधून ३:३० च्या सुमारास निघालो. म्हटले – अजूनही वेळ गेलेली नाही. दादरहून निघून ०४:३० ला बोरीवलीचा प्रयोग गाठू शकतो. पण नेमकं तिथेच सगळं गडबडलं. रेल्वेच्या विलंबाने बोरीवली गाठायलाच सायंकाळचे ०४:४५ झाले. तिथून ठाकरे १० मिनीटे. म्हणजे कितीही पळापळ केली तरी पाचशिवाय पोहोचणे कठिणच. ‘जाऊ दे. पुढच्या प्रयोगाला नीट आधीच तिकीट काढून जाऊया’ असं ठरवलं आणि मी घरी परतलो. मग अगदी त्याच दिवशी संध्याकाळी नाट्यगृह, चित्रपटगृह इत्यादी बंद करण्याची सूचना सरकार मार्फत केली गेली. आणि मग कळून चुकले कि आता काही इतक्यात नाटक नाहीच…

गेले काही दिवस कोरोनाचे संकट अधिकाधिक तीव्र होताना मनात एकच प्रश्न वारंवार येतो. तो म्हणजे – नाटकासाठी काम करणाऱ्या लोकांचे काय होत असेल ? त्यांना त्यांचेही कुटुंब आहेच कि. जसे आपण सगळे काम बंद म्हणून चिंतेत आहोत. पुढे येणाऱ्या आर्थिक संकटाच्या चिंतेने ग्रासलेले आहोत. तसेच त्यांच्याही परीवारावर, घरावर चिंतेचे ढग जमा झाले असतीलच. मग प्रशांत दामलेंसारख्या जेष्ठ कलाकार व निर्मात्यांनी आर्थिक मदत देऊनही काम सुरू होण्याची शाश्वती आजही नाहीच. त्या दिवशी चुकलेला एक प्रयोग मनाला इतकी रूखरूख लावेल, असे तेव्हा बिलकुल वाटले नव्हते. स्वप्नांतल्या त्या अंधारात आणि त्या स्तब्ध शांततेत मला अजूनही वाटतं राहतं कि, आता काहीच सेकंदात नाटकाची घोषणा होईल, कोणातरी पडद्याआडून ‘लेखक-दिग्दर्शक-नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार-वेशभूषाकार-रंगभूषाकार-कलाकार’ इत्यादी सगळ्यांची नावे घेईल, पडदा उघडेल, रंगमंच उजळेल,पार्श्वसंगीत सुरू होईल आणि कलाकार प्रवेश करेल. पण ते स्वप्न अर्ध्यातच भंगतं, सगळी निस्तेज शांतता अजूनच तीव्र होत जाते. अंधार गडद होत जातो आणि नाटकाच्या एका प्रयोगासाठी तडफडणारं एका कलाकाराचं ‘हृदय’ त्या अंधारात मला लख्खपणे समोर दिसू लागतं.

त्या हृदयाला प्रचंड वेदना होत आहेत. कारण गेले कित्येक दिवस ते ज्या शरीरात वास्तव्य करतय, त्याला कोणीच रंग लावलेला नाही. दोन प्रवेशांच्या मध्ये धावतपळत येऊन कपडे बदलण्याची कसरत त्याने अनुभवली नाही, संगीतांच्या तीव्रतेवर मनात उठणारे कल्लोळ त्याने अनुभवले नाहीत, कर्टन कॉलच्या वेळेस पडदा पडताना प्रेक्षकांचे भारावलेले चेहरे त्याने पाहीले नाहीत, प्रयोग संपल्यावर बॅकस्टेजला कृतकृत्य प्रेक्षकांची वाहवा मिळवली नाही, सही किंवा सेल्फी देताना मिळणारे समाधानही आता मिळत नाहीये…

हे सगळं जिव्हारी लागलेलं ते कलाकाराचं हृदय मी एकटक, पापणी न लवता पाहत राहीलो. जसे मंचावर घडणाऱ्या नाटकात गुंतून जातो तसेच ह्या हृदयाच्या वेदनांचे ध्वनी माझ्या मनाला गुंतवून टाकत होते. अखेर कलाकाराचेच हृदय ते… तडफडत असतानाही प्रेक्षकाला गुंतवण्यात यशस्वी झालेच.

मन आता कासावीस होऊ लागले होते. म्हणून नाट्यगृहाच्या त्या खुर्चीतून कसेबसे उठून मी सवयीनुसार विंगेत आलो आणि पाहतो तर काय……..

क्रमशः पुढे !

Podcast Episode

Ep. 1: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग १

3 Comments

  1. Savita ingale Reply

    Khupch chan abhi tumchi talmal aani tagmag doni hi samjat aahe pan hi veal kadhi aali tashi nighunhi janar aahe thoda veal lagel aani punha ekda to divas ugvel jithe punha sagle kahi nit suru hoial tumcha natkacha padada punha uaghdel aani to hi lavkarch tumchya hya likhnala punha vav mileal …hich swamin charni parthna

  2. Pingback: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग २ • रंगभूमी.com

  3. Maya Mahesh Jadhav Reply

    Abhi khup mastt ….agadi tuzya manat kay chalu aahe he kaltay. Vachtana samourn theater madhye 1 chakra Marun aalyacha bhas zala. Kharokhar natak preminna ha lockdown cha period kasa jat asel, tyanchya bhavana kay astil yacha vichar yeto. Pn Abhi lavkarch aapla dash Corona la harvnar n punha ya sagalya goshti purvvat honar. Tuzya pudhil vatchalisathi khup khup shubheccha ……Tai

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.
%d bloggers like this: