Author: प्रदीप देवरुखकर

१९७९ साली आम्ही “टेरेस थियेटर” चा पहिला प्रयोग केला. त्याकाळी उपनगरात नाट्यगृहे नव्हती. मराठी प्रेक्षक क्वचितच दादरला रवींद्र नाट्यमंदिर अथवा शिवाजी मंदिरला जात असतं. उपनगरातील प्रेक्षकांना नाटक पहाण्याचा आनंद कसा मिळवून देता येईल? याचा विचार “प्रयोग मालाड” ने केला आणि जन्माला आलं “टेरेस थियेटर”. प्रेक्षक नाट्यगृहाकडे जाऊ शकत नसतील तर नाट्यगृह प्रेक्षकांकडे न्यायचं. सोसायटीच्या गच्चीवर दोन हॅलोजन लाईट लावून कोणत्याही तांत्रिक गोष्टींशिवाय दोन एकांकिकांचा कार्यक्रम पूर्णपणे विनामुल्य करायचा असं ठरलं. वेगवेगळ्या हौसिंग सोसायटीच्या कमिटीशी संपर्क करायचा. त्यांना “टेरेस थियेटर” ची संकल्पना समजावून सांगायची. स्वत:च जाहिरात करायची. सोसायटीतील सभासदांना निमंत्रण द्यायचं आणि टेरेसवर दोन एकांकिका सादर करायच्या. प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळू…

Read More

१९७८ साली काही नाट्यवेड्या तरुणांनी एकत्र येऊन हा कट्टा सुरु केला. यातला एक वेडा मी होतो.  या नाट्यवेड्यांनी स्पर्धेला सादर केलेल्या एकांकिकेचं नाव होतं ‘वेडी’.  खरोखरच एक वेडा प्रकार होता तो.  सगळंच हसं झालं होतं.  मग आम्ही जिद्दीला पेटलो.  पुढील वर्षी अधिक तयारीने त्याच स्पर्धेत भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावला.  कट्ट्यावर आणखी काही तरुण मंडळी सामील झाली.  वेगवेगळ्या एकांकिका आणि नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी झालो.  तेथेही पारितोषिके पटकावली. तालमीच्या निमित्ताने कट्ट्यावर रोजच इच्छूकांची वर्दळ वाढू लागली.  फक्त एकांकिका आणि नाटके करण्यापेक्षा काही सामाजिक कार्य करता येईल का? याचा विचार सुरु झाला.  कट्ट्याला विस्तृत स्वरूप द्यायचे ठरले.  त्याप्रमाणे कला, ज्ञान, क्रीडा आणि…

Read More