सुशांत दीक्षित निर्मित

रविवार डायरीज

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक-दिग्दर्शक: चैतन्य सरदेशपांडे

Ravivar Diaries Marathi Natak
Choose a Show Below

आजच्या काळात माणसाची सगळ्यात मोठी भीती काय असेल.
सगळे जातात म्हणून मी शाळेत गेलो. सगळे जातात म्हणून मी कॉलेजात गेलो. पास झालो, डिग्री मिळाली पण ती सुद्धा सगळ्यांनाच मिळाली. लग्न झालं, मुलं झाली आणि मी आजूबाजूला बघितलं तर जवळजवळ बाकीचे सुद्धा असच जगात होते. मी रिटायर झालो आणि मेलो. अगदी सगळ्यांसारखं.
मी माझ्या आयुष्यात काहीही नवीन केलं नाही. करू शकलो नाही. किंवा मला भीती वाटत होती कि कशाला काही वेगळं करायचं. आपलं जे आहे तसं जगूया. जग बिग बदलण्याच्या फंदात आपण न पडलेलं बरं. आणि इथेच मी संपलो. माणूस म्हणून.
माणसं सगळी हि रविवार भोवती गिरक्या घेत असतात. सोमवारचा त्यांना राग येतो आणि रविवार आपण निवांत काढू ह्यासाठी ते सतत झटत असतात. मग हे सगळं आयुष्य एका रविवार भोवतीच फिरतंय असं नाही का वाटत? तर ते तसंच झालंय. आणि त्या साठी ह्या नाटकाचं नाव रविवार डायरीज असं आहे. एका साध्या माणसाची धडपड हि कशी आपली होत जाते आणि खरच आपण त्याच्या जागी आहोत असं वाटायला लागतं त्याची हि गोष्ट आहे.