mhaataari melyaacha dukkha ekankika cover

अभिनयाची शिदोरी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत

म्हातारी मेल्याचं दुःख

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक: अभिमान अजित
दिग्दर्शक: विनय कांबळे

mhaataari melyaacha dukkha ekankika cover
Choose a Show Below

म्हातारी मेल्याचं दुःख… ही एकांकिका भारतीय संस्कृतीतील आईवडिलांच्या संपत्तीवर मुलांचा हक्क आणि म्हातारपण आलेल्या आई किंवा वाडीलांच्याबाबत मुलांची कर्तव्ये या गोष्टींवर भाष्य करते. सध्याच्या काळातील विशेषतः शहरी कनिष्ठ मध्यमवर्गीय, एका खोलीच्या चाळीतल्या घरात राहणाऱ्या वृद्धांच्या समस्या, त्यांच्या भावनिक गरजा तसेच तरुणांच्या आर्थिक आणि स्वाभाविक शारीरिक गरजा तसेच माणसाची संधीसाधू, स्वार्थी तसेच निस्वार्थी, दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती अशा अनेक अंगांना स्पर्श करत ही एकांकिका मराठी भाषेतल्या ‘म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये पण काळ सोकावतोय’ ह्या सुप्रसिद्ध म्हणीचा आशय व्यक्त करते.

प्रकाश योजना- श्याम चव्हाण
रंगभूषा – श्रध्दा शेवडे
नेपथ्य- अभिमान अजीत
कलाकार – किर्ती शिंदे , प्रतिश शिंदे , राहुल खैरे, स्वप्निल चव्हाण,
दिव्या थोरात, पवन मातनकर, शुभम थोरात, प्रिया चव्हाण.