- जिगीषा अष्टविनायक निर्मित
संज्या छाया • मराठी नाटक
Natak Info
- Synopsis: तरुण मुलगा आणि सूनेने मिळून म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचा छळ केला आणि त्यांना घराबाहेर काढलं, नाही हो! असं या नाटकात काहीही नाही. नवरा बायकोच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे ते म्हातारपणी एकमेकांवर सूड उगवतात. छे! छे! असंही या नाटकात काहीही नाही. मुलाने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर, एक वयस्कर जोडपं वृद्धाश्रमात आपला वृद्धापकाळ एकमेकांच्या सहवासात व्यतीत करतं… अजिबात नाही! या नाटकात तसंही काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्टर बघून हे नाटक ‘judge‘ करण्याची चूक तर मुळीच करू नका. सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखं हे नाटक वृध्द व्यक्तींना तरुणासारखं जगण्याचा मंत्र देणारं आहे आणि तरुण मंडळींसाठी येणारा काळासाठी ‘FD‘ म्हणजेच ‘Fixed Deposit‘ ठरणार आहे. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया‘ या नाटकात ‘तसं काहीही नसलं‘ तरी रसिक प्रेक्षकांना भरभरून देण्यासारखं बरंच काही आहे.