Synopsis: एक इसम अपघाताने एका खुनाचा साक्षीदार ठरतो. टीव्ही रिपोर्टर्सना जेव्हा या साक्षीदाराबद्दल माहिती मिळते तेव्हा ते अर्थातच त्या माणसाचा बाईट रेकॉर्ड करण्यासाठी धाड टाकतात. त्याचा हा खुन्याबद्दलचा बाईट रातोरात वणव्यासारखा पसरतो. खुन्यापर्यंतही पोहोचतो. खुनी आपल्या एकुलत्या एक साक्षीदाराला मारण्याचा निर्णय घेतो. परंतु, पुढे आशा काही घडामोडी घडतात की खुन्याचे एका सज्जन माणसात परिवर्तन होते.