Synopsis: नुकताच अक्षररत्न पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ लेखक देवदत्त कामत यांना अचानक एके दिवशी नोटीस मिळते. एका अनोळखी स्त्रीने त्यांच्यावर त्यांचं आजवरचं सर्व लेखन चोरलेलं असल्याचा आरोप केलेला असतो. त्या महिलेशी या नोटीसबद्दल बोलण्यासाठी व तिची बाजू समजून घेण्यासाठी देवदत्त कामात तिला स्वतःच्या घरी अर्थात 38 कृष्ण व्हिला मध्ये बोलावतात आणि पुढे सुरू होतं एक रहस्यमय द्वंद्व! खरं खोट्याचं… खऱ्या खोट्या पलीकडील एका भावनेचं… एक अशी भावना जी माणसाला माणसाशी जोडून ठेवते.