Sunday, October 25, 2020

माझ्या आठवणीतील नाटक — सूर्याची पिल्ले

नक्की वाचा

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

माझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं

आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का...? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे...

राहुल हणमंत शिंदे याचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह Online विक्रीसाठी उपलब्ध!

रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या....

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजे २०१० साली ‘सुबक’ या नाट्यसंस्थेने आठवणीत रुतून बसलेल्या श्रेष्ठ नाट्यकृतींच पुनर्मचंन करून पाच जुन्या नाटकांचा नजराणा नाट्यरसिकांना सादर केला होता. त्या स्तुत्य  उपक्रमाबद्दल सुनील बर्वे हे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. त्यातीलच पहिले पुष्प होते सूर्याची पिल्ले

५ एप्रिल, १९७८ साली “धी गोवा हिंदू असोशिएशन” या नावाजलेल्या संस्थेने ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक प्रथम रंगमंचावर आणलं होत. त्यावेळी माधव वाटवे, बाळ कर्वे, दिलीप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर आणि शांता जोग या सारख्या दिग्गजांनी दामू केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकार केल्या होत्या. २०१० साली ‘सुबक’ ने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतलं, त्यावेळी प्रतिमा कुलकर्णी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते आणि कलाकार म्हणून वैभव मांगले, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उज्वला जोग, क्षिती जोग आणि उदय सबनीस यांचा सहभाग होता.

डोंबिवलीतील ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहांतील तो ‘हाऊसफुल्ल‘ प्रयोग आजही डोळ्यासमोर तरळत आहे. नाटकाला पहिल्या प्रयोगापासून मिळणारा प्रतिसाद निर्मात्या बरोबरच रसिक प्रेक्षकांना देखील सुखावणारा होता. कै. वसंत कानेटकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकार झालेल्या या कलाकृतीने ‘जुनं ते सोनं’ यांची प्रचिती पुन्हा एकदा आणून दिली होती.

स्वातंत्र्यसूर्य पंजाबराव ‘तथा’ आबाकाका कोटीभास्कर यांचे वारसदार असलेले पांडू अण्णा, बजरंग दादा, रघुराया, आणि श्रीरंग यांच्याशी आणि त्यांनी अंगिकारलेल्या विचारणीशी संबंधीत नाटकाचं कथानक आहे. स्वातंत्र्यसूर्याचे वारसदार असल्यामुळे आपणही थोर आहोत आणि आपल्याकडूनही काही दिव्य घडत आहे, अशी त्यांची भ्रामक समजूत असते आणि तीच त्यांची विचारसरणीही बनते. वडील थोर राष्ट्रपुरुष पण लोकांनी येता-जाताना आपल्यालाही मुजरे करायला पाहिजे, ही मुलांची अपेक्षा असते. लोकं ‘कोटीभास्करांचा वाडा’ ऐवजी ‘कोटीभास्करांची चाळ’ म्हणतात ही खंतही त्यांना आहेच. ‘सूर्याची पिल्ले’ ही किताबता देखील चाळकरी बंधुनीच त्यांना दिलेली असते. पंजाबराव कोटीभास्कर यांच्या वर्तमानपत्राचे संपादक असलेले पांडू अण्णा सर्वात थोरले कोटी भास्कर, ह्या भूमिकेत वैभव मांगले या चतुरस्त्र कलावंताने आपल्या अभिनयाने आणि अफलातून संवादफेकीने नाटकात रंगत आणली होती. ‘स्वातंत्र सैनिकांच सळसळत रक्त नसानसांत भरल आहे…’ अस वारंवार सांगणारे दुसरे चिरंजीव बजरंगदादाच्या भूमिकेत आनंद इंगळे यानी प्रयोगात अफलातून बहार आणली होती. आपला अभिनय, संवादफेक आणि देहबोली यांच्या जोरावर आनंद इंगळेनी संपूर्ण रंगमंच व्यापला होता. रघुराया ही भूमिका पुष्कर श्रोत्री याने दिलीप प्रभावळकर यांच्या इतकाच भाबडेपणा चेहऱ्यावर ठेऊन साकार केली होती. नाटकामध्ये रघुरायांच्या प्रेमप्रकरणाचे उपकथानक असल्यामुळे पुष्करच्या भूमिकेला वाव देखील चांगला होता. श्रीरंगच्या भूमिकेतील अनिकेत विश्वासरावचा वावरही सहज होता. पंजाबराव कोटीभास्करांनी आपल्या संस्थांचे नेमलेले एकमेव ट्रस्टी जांबुवंतराव यांच्या मदतीने श्रीरंग आपल्या बंधुंना कसा वठणीवर आणतो, हा नाटकातील भाग खूपच रंगतदार झाला. नाटकातील तीन ज्येष्ठ बंधुंपेक्षा प्रत्यक्षात ज्येष्ठ कलाकारां समोर त्याच तडफेने रंगमंचावर उभे रहाण्याची अनिकेतची जिद्द वाखाणण्या सारखी होती. उदय सबनीस, उज्वला जोग आणि क्षिति जोग यांनीही आपल्या भूमिका चोख वठवल्या होत्या.

एकंदरीत ‘सूर्याची पिल्ले’ पुनर्जिवित नाटक असले तरी त्यावेळी एका नवकोरं करकरीत नाटकाचा सुखावणारा अनुभव नाट्यरसिकांना देऊन गेला होता. त्यावेळी फक्त पंचवीस प्रयोगांच्या घोषणेमुळे अनेक नाट्यप्रेमी रसिकांना या यशामध्ये भागीदार होता आले नाही याची खंत होतीच, त्यामुळे आलिकडेच “सूर्याची पिल्ले” पुन्हा रंगमंचावर अवतरणार असल्याच्या ‘सुबक’ बातमीने त्यांच्यासाठी ही नवीन पर्वणीच खुली होणार आहे. नाट्यगृहात प्रवेश करताना प्रेक्षकांचे स्वागत आणि नाटक संपल्यानंतर सर्व कलाकारांनी रंगमंचावर येऊन रसिक प्रेक्षकांना अभिवादन करण्याची ‘सुबक’ने सुरू केलेली प्रथा स्तुत्यच म्हणावी लागेल. अलीकडे बहुतेक सर्वच प्रयोगामध्ये ह्याचं अनुकरण केल जातं, ह्याचं खरं श्रेय ‘सुबक’ला आहे.

[Photo via Facebook]

vijaykumar anavkar

विजयकुमार अणावकर

डोंबिवली (पूर्व)

हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.

- Advertisement -

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

TPL 2020 Online नाट्यमहोत्सव – तब्बल ४०० लोकांनी घर बसल्या बघितली खुमासदार नाटकं!

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे...

थिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)

लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी...

रातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या "रातराणी" या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात...

Nope! You cannot copy the content on this page, sorry.