Search for:
साहित्य सहवास

साहित्य सहवास — विविध विषयांवरील लेख आणि कथांचा संग्रह

Pinterest LinkedIn Tumblr

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आणि COVID-19 ला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलं. ह्याच पार्श्वभूीवर आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी Lockdown चा ऐलान केला. शाळा, कॉलेज, कार्यालयं बंद झाली आणि अख्खा देशच स्तब्ध झाला. कोरोनाशी चार हात करण्यासाठी घरी बसून राहणे हा एकच रामबाण उपाय आहे हे आता निश्चित झाले आहे. बरं तुम्ही म्हणाल, हे सगळं तर आम्ही जाणून आहोत यात नवीन काय? नवीन असणार आहे तो म्हणजे या सर्व परिस्थितीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन!

Corona, Lockdown, Quarantine सगळं सगळं अगदी खरं आहे. पण या सर्व परिस्थितीची सकारात्मक बाजू बघितलीत तर तुम्हाला जाणवेल की अगदीच १००% सगळं थांबलेलं नाही. बरेच जण घरून ऑफिसचं काम करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी त्यांचा अभ्यास घरी बसून करत आहेत. काही जणांचे Online अभ्यासवर्गही सुरू आहेत. हेच आपल्यालाही करायचं आहे! आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थीच असतो. पण आज आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यामध्ये मुद्दाम विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरणं गरजेचं आहे. कारण शारीरिकरीत्या जरी आपण बांधील असलो तरी आपली बौद्धिक क्षमता कमी झालेली नाही. लेखकाच्या लेखणीला अजूनही तीच धार आहे. अभिनेत्यांच्या अभिनयक्षमतेलाही तोच पोत आहे आणि दिग्दर्शकांच्या आकलनक्षमतेलाही तोच जोर आहे. जर तुम्ही विद्यार्थीवर्गामध्ये प्रवेश करण्यास तयार असाल तर या अशा विविध विभागांमध्ये काही प्रमाणात तुम्हाला मार्गदर्शन करायला रंगभूमी.com सज्ज झाली आहे. येथे रंगभूमीशी निगडित बऱ्याच गोष्टींचे धडे सतत मिळत राहतील आणि हे धडे बाहेरून कोणी येऊन आपल्याला देणार नाही तर रंगभूमीचे वाचकच स्वतःच्या अभ्यासाचे इतरांबरोबर आदानप्रदान करणार. म्हणजेच कधी तुम्ही शिष्य तर कधी तुम्हीच गुरूच्या भूमिकेतही असाल. रंगभूमीदेखील काही काळ Lockdown मध्ये अडकून पडली आहे या गोष्टीची जर तुम्हाला कल्पना असेल तर तुम्हाला हेही माहित असेल की Lockdown संपल्यानंतर रंगभूमीची घडी पूर्ववत बसायलाही तितकाच वेळ लागणार आहे आणि ही घडी बसवायला मनुष्यबळही तितकंच लागणार आहे. हा अभ्यास म्हणजे त्याचीच पूर्वतयारी समजा हवं तर!

लेख कथा लेखन – नाटक घडवणं म्हटलं की त्याचा पाया रचला जातो तो कथेमध्ये. कथा हा नाटकाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अशाच काही कथा आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. तुमचे काही लेख, कथा संग्रहात असतील तर hello@rangabhoomi.com या ई-मेलवर पाठवा. आम्ही ते तुमच्याच नावाने प्रसिद्ध करू.

प्रकाशयोजना – नाटकातील कलाकारांना योग्य वेळी प्रकाशझोतात आणून कथा आणि पटकथेला बांधून ठेवणारा महत्वाचा भाग म्हणजे प्रकाशयोजना. यासंबंधित तुमचे अनुभव किंवा मार्गदर्शनपर लेख आमच्यापर्यंत नक्की पाठवा.

नेपथ्य – लेखकाची कथा देखाव्याच्या स्वरुपात रंगमंचावर उभी करून नाटक प्रेक्षकांसमोर जिवंत करण्याचा हरहुन्नरी प्रयत्न म्हणजे नेपथ्य.

रंगभूषा व वेशभूषाकार – याबद्दल काय आणि किती सांगावे! नटनट्यांना रंगमंचावर कथेतील भूमिकेप्रमाणे सादर करण्याची कामगिरी बजावणारे हे कलाकार. नटाला नटी आणि नटीला नट बनवणारे किमयागार! जितके त्यांचे काम अनोखे तितकेच त्यांचे अनुभवही रोचक असतील. तेही आपण इथे जाणून घेऊ शकतो.

अभिनय अर्थात नाटकाचा गाभा. इथे मार खाल्ला तर क्षमा नाही. कथेतील लेखकाने रेखाटलेली भूमिका प्रेक्षकांपर्यंत १००% अचूक पोहोचविण्याचा अट्टहास म्हणजे अभिनय!

दिग्दर्शन – वरील नमूद केलेल्या आणि इतर समांतर विभागांचे गणित जुळवून बनलेले रसायन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा जादूगार म्हणजे दिग्दर्शक!

बघा किती सहजरीत्या तुम्ही आत्ताच विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरलात सुद्धा. मग विचार करा जेव्हा या आणि अशा बऱ्याच विभागातील जाणकार आपल्याशी संवाद साधतील तेव्हा काय माहौल बनेल! असाच माहौल आपल्याला “साहित्य सहवास” या आपल्या नव्या सदरामध्ये बनवायचा आहे आणि हा सहवास अखंड अनुभवण्यासाठी आपण एकमेकांशी सतत जोडलेलं असणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच रंगभूमी.com वर ई-मेल द्वारे Subscribe करून या नवीन सदरातील नवनवीन लेख तुम्ही वाचू शकता. जेणेकरून तुम्हाला रंगभूमी.com वर पुनःपुन्हा नवीन लेखांसाठी वाट बघावी लागणार नाही आणि नवनवीन लेख आपोआप तुमच्यापर्यंत ई-मेल इनबॉक्स द्वारे पोहोचतील.

Join 25 other subscribers

आणी रंगभूमी.com वर दररोज येणाऱ्या ताज्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा तुम्ही आता Google News वर घेऊ शकता. थेट तुमच्या मोबाईल वर.

तसेच, तुमचे या विविध विभागांमधील अनुभव आणि माहितीबद्दलचे लेख तुम्हाला तुमच्या नावाने रंगभूमी.com वर प्रकाशित करायचे असल्यास तुमचे लेख hello@rangabhoomi.com या ई-मेल द्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.