दोन व्यावसायिक नाटकं केल्यानंतर शिल्पा तुळसकर यांना खरी ओळख मिळाली ती सुयोग निर्मित “जावई माझा भला” या नाटकाद्वारे. वडिलांच्या भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकर सोबतचं त्यांचं काम आणि त्यांच्यातील बापलेकीचं नातं सर्वांसाठीच संस्मरणीय आहे.मराठी व्यतिरिक्त हिंदी,गुजराती आणि इंग्रजी नाटकातून शिल्पा तुळसकर प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.”सुबक”च्या “हर्बेरियम” या उपक्रमांतर्गत बाळ कोल्हटकर लिखित अजरामर नाटक “लहानपण देगा देवा”या नाटकाचे २५ प्रयोग ही त्यांनी केले आहेत.