महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे गेले कित्येक वर्ष, महाविद्यालयातील तरुण विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देणारी, पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहेत. ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गेले ५८ वर्ष जोमाने पार पडते. स्पर्धेचं हे वर्ष विशेष यासाठी आहे कारण, राजाभाऊ नातू या मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकाराचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते पुण्याच्या नाट्यचळवळीतील सक्रिय कार्यकर्तेही होते. पुण्यातील ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ या नाट्यसंस्थेमार्फत इ.स. १९६३ सालापासून आयोजिल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेच्या घडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
Purushottam Karandak 2024 – Prathamik Feri Pune
या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, फक्त लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीन गोष्टींना अधिक महत्त्व या स्पर्धेत दिले जाते. मागील वर्षी म्हणजेच पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२३ च्या अंतिम फेरीत, कोल्हापूर केंद्रावरच्या संघांनी बाजी मारली होती! पुरुषोत्तम प्रथम करंडक हा पुण्यातील महाविद्यालयाला तर, पुरुषोत्तम द्वितीय, तृतीय आणि प्रायोगिक असे तीन सांघिक करंडक व चार वैयक्तिक पारितोषिके आणि एक उत्तेजनार्थ पारितोषिक अशी भरघोस पारितोषिके कोल्हापुरातील महाविद्यालयांनी मिळवली.
Purushottam Karandak 2024 Dates in Pune
हे २०२४ चे वर्ष म्हणजे महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे ५९ वे वर्ष! या वर्षीची पुण्यातील प्राथमिक फेरी जाहीर झाली असून ती १६ ऑगस्ट २०२४ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत भरत नाट्यमंदिर, पुणे येथे रंगणार आहे. पुरुषोत्तम करंडक २०२४ ची संपूर्ण उत्सव पत्रिका(सीझन पास) १०००/- (स्टॉल) आणि ५००/- (बाल्कनी) आकारण्यात आली आहे. ही उत्सव पत्रिका Ticket Khidakee वर ऑनलाइन स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, डेली तिकीट विक्री भरत नाट्य मंदिर वर १६ ऑगस्ट पासून दररोज संध्या. ४ वा. पासून सुरु असेल. सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे.
Purushottam Karandak 2024 Ekankika Schedule and Timings
यंदाची पुण्यातील प्राथमिक फेरी ही नेहमीप्रमाणे सर्वच महाविद्यालयाच्या संघांकडून फार उत्साहाने व जोमाने पार पडणार असे दिसून येते. रंगभूमी.com तर्फे महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला व पुण्यातील सहभागी असलेल्या सर्व संघांना खूप साऱ्या शुभेच्छा!