रंगभूमी.com तर्फे गेली ४ वर्षं तुम्हाला सातत्याने नाट्यसृष्टीशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आजही अविरत सुरू आहे. नवीन नाटकांबद्दल माहिती, त्याबद्दलच्या प्रेक्षक प्रतिक्रिया आणि पुढील प्रयोगांचे वेळापत्रक, कलाकारांच्या मुलाखती आणि बरंच काही आम्ही आमच्या Website, YouTube, Instagram, आणि इतर काही माध्यमातून तुमच्या भेटीसाठी आणत असतो. याच प्रवासात आज आम्ही एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. एक दमदार एकपात्री नाट्यकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा विचार गेले काही महिने आमच्या मनात सतत डोकावत होता आणि पुण्यातील एका युवा दिग्दर्शकाच्या पुढाकाराने हा विचार प्रत्यक्षात उतरवून दाखवलाय. त्या युवकाचं नाव आहे शिवम पंचभाई! याआधी ‘अंडासेल’ आणि ‘दोन भुते’ या नाटकांचं दिग्दर्शनही त्याने केलं होतं. आता दि. बा. मोकाशी यांच्या कथेवर आधारित ‘वणवा’ हा सव्वा तासाचा नाट्यदीर्घांकाचे शिवमने नाट्यरूपांतरण आणि दिग्दर्शित केले आहे आणि येत्या २६ ऑक्टोबर रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येत आहोत. या दीर्घांकाची वैशिष्ट्ये काय?, नाटकाची तिकिटे कुठे मिळतील?, नाटकातील कलाकार कोण?, शुभारंभ कुठे व किती वाजता होणार आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
काय आहे ‘वणवा’?
वणवा ही दि. बा. मोकाशी यांच्या वणवा या कथासंग्रहातली एक गोष्ट आहे. या कथेचं मुख्य पात्र आहे सरस्वती, सरस्वती ही कातकरी आदिवासी समाजातली एक साधी सरळ मुलगी आहे. तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे. एक रात्री जंगलात लागलेल्या वणव्याची कहाणी आहे. वणवा लागण्यापूर्वीची शांतता, वणवा पेटल्यानंतर जंगलात जनावरांची-माणसांची होणारी धावपळ आणि वणवा विझल्यानंतर जाळून राख झालेल्या जंगलासोबत मनात घर करून बसणारी शांतता! असा एकूण गोष्टीचा आलेख आहे.
एका शांततेकडून दुसऱ्या शांततेपर्यंतचा प्रवास गोष्टीत मांडलेला आहे. कातकरी आदिवासी समाज जो पूर्णपणे जंगलावर अवलंबून असतो त्यांच्या नजरेतून गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते. पर्यावरणाचा होत जाणारा ऱ्हास यावर सुद्धा गोष्टीत भाष्य केलं आहे.
Vanva Opening Show in Pune and Ticket Booking
२६ ऑक्टोबर २०२४, सायं. ७ वा. @ सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे (Google Maps)
पुढील क्रमांकावर संपर्क करून तिकिटे बुक करू शकता. तिकीट शुल्क — ₹१५०/-
फोन बुकिंग — ७३८५०२९५६७
नाटकाची ऑनलाइन तिकिटे तुम्हाला पुढील लिंकवर मिळतील.
www.ticketkhidakee.com/vanva
Special Student Discount
२२ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवून ₹१००/- अशा विशेष सवलत दरात तिकिटे मिळणार आहेत. त्यासाठी ७३८५०२९५६७ या क्रमांकावर संपर्क करून लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.
Vanva Opening Show in Mumbai
मुंबई — ९ नोव्हेंबर २०२४ (अधिक माहिती लवकरच!)
वणवा नाटकाची वैशिष्ट्ये
आपण पूर्ण गोष्ट सरस्वती या कातकरी मुलीच्या नजरेतून बघतो. एकच पात्र रंगमंचावर वावरताना दाखवून जंगलातील एकाकीपणाचा आभास निर्माण करण्यात येणार आहे.
मूळ गोष्टीत जंगल, वणवा, जंगलातील जनावर या काही नैसर्गिक गोष्टी आहेत. या गोष्टी नाटकात सामावून घेताना काही मार्ग अवलंबण्यात आले आहेत. त्यातला एक म्हणजे आवाज! जंगलातल्या वेगवेगळ्या आवाजांचा एक साऊंडस्केप आणि आदिवासी परंपरेतल्या काही चाली वापरून तयार केलेली सुरेल गाणी वापरून जंगल करण्याचा एक कल्पनात्मक प्रयोग या नाटकातून दिसणार आहे.
त्याचबरोबर, विशिष्ट शारीरिक हालचालींचा वापर करून जर जंगल किवा इतर गोष्टी उभ्या करता आल्या तर त्यातून जंगल, वणवा यातला जीवंतपणा साध्य करण्याचा आगळावेगळा प्रयोग या नाटकात दिसणार आहे.
हे नाटक एकाच वेळेला अभिनय, विशिष्ट शारीरिक हालचाली आणि आवाज अशा तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे.
Vanva — Cast & Crew
कलाकार – समृद्धी खडके, रश्मी माळी, प्रज्ञा समर्थ
नाट्य-रूपांतर आणि दिग्दर्शन – शिवम पंचभाई
संगीत – पार्थ घासकडबी, इंद्रनील हिरवे
पार्श्व गायन – निकिता ठुबे, पार्थ घासकडबी, इंद्रनील हिरवे
निर्मिती – रंगभूमी.com आणि INcomplete Theatre
निर्मिती व्यवस्थापक – अनघा कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी
संगीत संयोजन – चैतन्य बीडकर, शुभंकर भागवत
प्रकाश योजना – यश पोतनीस, स्वच्छंद
Publicity Design – शुभम कुलकर्णी
आमच्या अन्य उपक्रमांप्रमाणे हा नवा उपक्रमही आमच्यासाठी तितकाच प्रिय आणि महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही आमच्या या नव्या नाटकाला तितकंच प्रेम आणि भरभरून प्रतिसाद द्याल याबद्दल आम्हाला शंकाच नाही. तर भेटू २६ तारखेला पुण्यात!