Wednesday, May 19, 2021

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

- जाहिरात -

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही संस्था रसिक प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे “बिराड” हि एकांकिका! हे प्रक्षेपण विनामूल्य करण्यात येणार आहे याची तमाम रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी.

१७ ऑक्टोबर, २०२० रोजी रात्रौ ८ वाजता “बिराड” या एकांकिकेचं कलांश थिएटरच्या YouTube चॅनेलवर Live premiere करण्यात येणार आहे. सर्व नाट्यरसिकांसाठी ही एक सुखद पर्वणीच असणार आहे. कलांश थिएटरच्या YouTube चॅनेलची लिंक पुढे दिलेली आहे. आताच त्या लिंकवर क्लिक करून चॅनेलला Subscribe करून ठेवा.

https://www.youtube.com/channel/UCdVZn_2J-HSJR0TljTUpufw- Advertisement -

याच चॅनेलवर आयोजकांनी बिराड एकांकिकेचे छोटेसे ट्रेलरही पूर्वप्रक्षेपित केले आहे. ते नक्की बघा! हे ट्रेलर एकांकिका बघण्याची उत्सुकता वाढवेल याबाबत शंकाच नाही.

तर विसरू नका उद्या ठीक रात्री ८ वाजता कलांश थिएटरच्या YouTube चॅनेलवर ही दर्जेदार एकांकिका बघायला!

- Advertisement -
- Advertisement -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.