Saturday, January 16, 2021

THEATREEL — १३ दिवस, १३ तास, १३ कथा, १३ अभिनेत्री, १३ दिग्दर्शक

हो! लवकरच सुरू होतोय १३ दिवसांचा हा अनोखा Online सोहळा, ज्याचं नाव आहे THEATREEL! “Clubture” या कलाकारांच्या एका ग्रुपने THEATREEL या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची नुकतीच घोषणा केली आहे. १३ विविध अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेला हा कार्यक्रम १ ऑगस्ट, २०२० ते १३ ऑगस्ट, २०२० अशा १३ दिवसांमध्ये प्रेक्षकांना बघता येणार आहे.

संकल्पना — Theatreel पूर्णतः हुसेन झैदी लिखित “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” या पुस्तकातील १३ विविध कथांवर आधारित असणार आहे. या पुस्तकामध्ये माफिया गॅंगशी जोडल्या गेलेल्या १३ स्त्रियांच्या १३ विविध कथा आहेत. याच १३ कथा संपूर्ण महाराष्ट्रभरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद अशा विविध शहरांमधून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमी गाजवलेल्या १३ अभिनेत्री त्यांच्या एकपात्री अभिनयातून सादर करणार आहेत. त्यांना योग्य असे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून काही निपुण दिग्दर्शकही त्यांची साथ देणार आहेत.

प्रवेश शुल्क — या १३ दिवसांच्या आणि १३ तासांच्या संपूर्ण सोहळ्यासाठी तुम्हाला फक्त २००/- शुल्क ९७६५१८०६३० या क्रमांकावर GPay करावयाचे आहेत. प्रवेश शुल्क भरल्यावर तुम्हाला Zoom App ची प्रत्येक सादरीकरणाची लिंक देण्यात येईल. या लिंकचा वापर करून तुम्ही घर बसल्या सादरीकरणाचा आनंद घेऊ शकता.

अभिनेत्री-दिग्दर्शक-पात्र — कोणते पात्र कोणत्या अभिनेत्रीने सादर करायचे आणि त्यांना मार्गदर्शन कोण करणार हेही २४ जुलै, २०२० रोजी अतिशय अनोख्या पद्धतीने ठरवण्यात आले आहे. या निवडप्रक्रियेचा व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा. कलाकारांच्या जोड्या आणि त्यांच्या सादरीकरणाच्या तारखा पुढीलप्रमाणे असणार आहेत.

वेळ – १ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट सायंकाळी ठीक ७:३० वाजता तुम्ही कलाकारांचे सादरीकरण बघू शकता.

सर्वच कलाकार खूप मेहनत घेत आहेत. कमी वेळात खूप सुंदर सादरीकरण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. हा पूर्ण अनुभव नाटकाचे तिकीट काढून नाटक बघण्यासारखाच असेल. त्यामुळे नाटकाची ओढ असणारा आणि lockdown मध्ये नाटक बघण्यासाठी उत्सुक झालेला नाट्यरसिक नक्कीच ही संधी हातातून जाऊ देणार नाही. त्यामुळे त्वरा करा. लवकरात लवकर तुमचे तिकीट बुक करा आणि या Online नाट्य मेजवानीचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा!

- Advertisement -

More articles

1 COMMENT

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.

%d bloggers like this: