Search for:
News

नाटकाची Free Home Delivery — पुण्यातल्या Theatron Entertainment चा YouTube द्वारे अनोखा प्रयोग

Pinterest LinkedIn Tumblr

Lockdown च्या परिस्थितीतही घर बसल्या सहकुटुंब, सहपरिवार Live नाटक बघायला मिळालं तर काय बहार येईल ना मंडळी! असाच काहीसा प्रयत्न केला आहे पुण्याच्या एका Theatre Group ने ज्याचं नाव आहे Theatron Entertainment. कोरोनासारख्या भीषण जागतिक महामारीमुळे या टीमला त्यांचे प्रयोग रद्द करावे लागले आणि म्हणूनच त्यांनी आधीच शूट केलेले नाटकाचे प्रयोग YouTube वर Live दाखवायचे ठरवले. या उपक्रमात Theatron Entertainment आपल्यासाठी ३ वेगवेगळी नाटकं घेऊन येत आहे. ज्यांची नावं आहेत “मिकी”, “भंवर” आणि “ऍनाथेमा”. ही नाटकं तुम्ही पुढे दिलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या दिवशी रात्री ९:३० वाजता Theatron Entertainment च्या Youtube Channel वर Live बघू शकता. YouTube वर नाटकं तशी खूप आहेत. पण, Live नाटक प्रक्षेपण हा प्रकार नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य आहे. त्यामुळे, जर तुम्ही ९:३० ची वेळ चुकवलीत तर ते नाटक परत बघता येणार नाही. म्हणूनच, आत्ताच YouTube वरील Theatron Entertainment चॅनेलला Subscribe करा आणि घरपोच Live नाटकाच्या फ्री डिलिव्हरीचा अनुभव घ्या.

नाटकांच्या Live प्रक्षेपणाव्यतिरिक्त Theatron Entertainment आणि Ruma Creations तुमच्यासाठी घेऊन आला आहे “५ चा चहा”! नाही म्हणजे, चहा तुमच्या घरचाच, पण संध्याकाळच्या ५ च्या चहासोबत खुसखुशीत गप्पा मारायला तुमच्यासोबत असतील विविध कलाकार. प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हरीश दुधाडे, दिगपाल लांजेकर या कलाकारांचा या कार्यक्रमात सहभाग असेल. या कार्यक्रमांचा आनंद तुम्ही पुढे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे Facebook वरील Theatron Entertainment आणि rumacreations अशा दोन संकेतस्थळांवर सायंकाळी ५ वाजता घेऊ शकता.

तसेच शिवानी रांगोळेसोबत YouTube वर सकाळी ११ वाजता Reading Room with Shivani हा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. शिवानी रांगोळे जी सध्या Netflix वरील “SHE” नावाच्या Web Series मधील तिच्या रुपा नावाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे, तिला वाचनाची अतिशय आवड आहे आणि आजवर तिच्या वाचनात आलेल्या काही लेखकांच्या कथा आणि कवितांचं वाचन ती या कार्यक्रमात सादर करणार आहे. हा कार्यक्रमही प्रेक्षकांची तितकीच दाद मिळवत आहे.

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या आणि स्वत:च्याच घरात lockdown झालेल्या तमाम जनतेसाठी Theatron Entertainment ने राबविलेला हा उपक्रम म्हणजे एक सुखद पर्वणीच ठरणार आहे. तिकिटाच्या रांगेतही उभे न राहता घरगुती बटाटे वडे खात नाटकं Live बघायला मिळणार असतील तर एका कट्टर प्रेक्षकाला “स्वर्गाहुनी सुंदर घरटे” असेच जणू म्हणावेसे वाटेल. युवा पिढीकडून सातत्याने असे नवनवीन Online प्रयोग होत राहोत हीच सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.