Prem Karava Pan Japun • Prem Karave Pan Japun • Marathi Natak • Malwani Natak • Prem Karaava Pan Japoon
- मधुसंगिता थिएटर्स + अर्चना थिएटर्स निर्मित
प्रेम करावं पण जपुन! • मराठी नाटक
Comedy Natak
- लेखक: संकेत शेटगे
- दिग्दर्शक: विशाल-दिपेश
- कलाकार: भक्ती तारलेकर, विशाल तांबे, संकेत शेटगे, मृदुला कुलकर्णी
Natak Crew
Natak Info
- Synopsis: सुरेखा(भक्ती तारलेकर) ची मैत्रीण श्रावणी(मृदुला कुलकर्णी) तिच्या घरी राहायला येते. तिथेच श्रावणीची भेट होते सुरेखाच्या मित्राशी, म्हणजेच आकाश(संकेत शेटगे)शी. आकाश आणि त्याचा भाऊ संत्या(विशाल असगणकर) त्यांच्याच बिल्डिंगमध्ये वरच्या माळ्यावर राहत असतात. आकाश आणि श्रावणी लगेच एकमेकांकडे आकर्षित होतात आणि लवकरच त्यांचं प्रेम खुलू लागतं. पण परस्परविरोधी विचारांचे आकाश आणि श्रावणी भांडू लागतात. प्रेमाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल दोघांचे वेगळे विचार असतात. श्रावणी, ही ज्याच्यावर प्रेम करेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारी मुलगी असते. पण आकाश तिच्या अगदी विरुद्ध, जपून, सावधपणे प्रेम करणारा मुलगा असतो. त्यामुळे श्रावणी जेव्हाही त्यांचं नातं पुढे न्यायचा प्रयत्न करते, आकाश आडकाठी घालतो. त्यांच्या या विरोधी स्वभावामुळे त्यांच्यात वाद व गैरसमज होतात. संत्या आणि सुरेखा त्यांची समजूत घालायचा बराच प्रयत्न करतात पण ते सगळे प्रयत्न निष्फळ होतात. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्याला अशी काही कलाटणी मिळेल, ह्याचा त्यांनी कधीच विचार केलेला नसतो. आता हा ट्विस्ट काय आहे, संत्या आणि सुरेखा काय युक्त्या लढवतात आणि आकाश आणि श्रावणी च्या नात्याचं पुढे काय होतं हे जाणून घ्यायला ‘प्रेम करावं पण जपून’ हे नाटक तुम्ही प्रेक्षागृहात जाऊनच पाहायला पाहिजे.
Text Review
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.