Synopsis: अल्ब्रेक्ट हा एका जुन्या नाट्यगृहाशी सहयोगी असलेल्या कलाकारांच्या नाट्यमंडळाचा भाग असतो व त्याला मंडळाचे बजेट कापण्याचा विचार चालू असल्याची बातमी समजते. अल्ब्रेक्ट हा हाडाचा नाट्य कलाकार… त्यामुळे मंडळाचं बजेट कापलं जाणार हे कळताच हा रिपोर्ट ज्या व्यवस्थापन कंपनीने बनवला आहे त्या कंपनीच्या एका व्यक्तीला बिजनेस डीलची आशा दाखवावी आणि त्याच्याशी संवाद साधून त्याची मतं बदलावीत असा विचार तो करतो. त्यासाठी इत्यंभूत तयारीदेखील करतो. पण समोर येते एक २० वर्षांची तरुणी, जिला नाटकात काडीमात्र रस नसतो. त्याला जाणवतं की आकड्यांवर प्रेम असलेल्या व्यक्तीला त्याला साहित्याचं सौंदर्य समजवावं लागणार आहे. अर्थातच, हे काम त्याला वाटत तितकं सोपं असणार नसतं. एका कट्टर रंगकर्मीने, ‘प्रॅक्टिकल’ जगात वावरणाऱ्या आणि ९९% रोबोट बनलेल्या हाडामासाच्या मनुष्यप्राण्याच्या मनाला घातलेली सार्त हाक म्हणजे चार्ल्स लेविन्स्की लिखित शौनक चांदोरकर अनुवादित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अडलंय का…?’ हे नाटक!