गेल्या काही वर्षात निर्मिती झालेल्या व्यावसायिक, मनोरंजक आणि ग्लॅमरस नाटकांकडे तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की फार निवडक नाटकं अशी आहेत जी प्रायोगिक आशय जपून ठेवणारी आहेत. हौशी नाट्य निर्मिती करणाऱ्या संस्था, अशी प्रायोगिक नाटकं फक्त राज्य नाट्य स्पर्धेपुरतीच मर्यादित ठेवतात. असे प्रायोगिक विषय पूर्वी गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे यांसारख्या दिग्गज लेखकांच्या संहितांमध्ये दिसून यायचे. मात्र अलीकडच्या काळात नवीन प्रायोगिक लेखन दिसणं कठीणच झालंय! विचार करायला लावणाऱ्या ‘प्रायोगिक’ नाटकांचं लेखन फारसं बघायला मिळत नाही. पण या मताला अपवाद म्हणून लेखक दत्ता पाटील यांचे नाव घेता येईल. त्यांनी लिहिलेल्या अनेक संहिता याचं उदाहरण असू शकतात. त्यांच्या ‘कलगीतुरा’ आणि ‘तो राजहंस एक’ या प्रायोगिक नाटकांना यावर्षी अनेक पारितोषके सुद्धा मिळाली आहेत. या नाटकांचं सशक्त आणि उल्लेखनीय सादरीकरण करण्यामागे दिग्दर्शक सचिन शिंदे यांचाही मोठा हातभार आहे. याच लेखक – दिग्दर्शक जोडीची काही प्रायोगिक नाटकं सध्या मराठी रंगभूमीवर सुरू आहेत. त्यांच्या या प्रायोगिक नाटकांचा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य चौफुला!’
येत्या काही दिवसात ‘नाट्य चौफुला’ हा दत्ता पाटील लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित, प्रायोगिक नाटकांचा महोत्सव प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या नाट्य महोत्सवात ‘हंडाभर चांदण्या’, ‘दगड आणि माती’, ‘कलगीतुरा’ आणि ‘तो राजहंस एक’ अशी चार नाटकं सादर होणार आहेत. विशेष म्हणजे हा प्रायोगिक नाटकांचा महोत्सव प्रायोगिक पद्धतीनेच होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण, या चार नाटकांचे सलग सादरीकरण होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक सलग नाट्यानुभव असणार आहे. तसंच, हा महोत्सव एकदाच होणार नसून या महोत्सवाचेही प्रयोग होणार आहेत.
पुणे
दिनांक: शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४
स्थळ: श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे
वेळ: दुपारी २ ते रात्री १० सलग
मुंबई
दिनांक: रविवार १ सप्टेंबर २०२४
स्थळ: काशिनाथ घाणेकर नाटयगृह (मिनी), ठाणे
वेळ: दुपारी २ ते रात्री १० सलग
मुंबई — ऑनलाईन बुकींग येथे करा
महोत्सव प्रवेशिका — ₹५००/- फक्त!
आपली तारीख राखून ठेवा आणि आजच तिकीट बुक करा.
एकाच दिवशी चार गाजलेल्या नाटकांचा हा सलग नाट्यानुभव प्रेक्षकांना विलक्षण अनुभूती देणारा आहे.
‘नाट्य चौफुला’ महोत्सवात सादर होणारी नाटकं
हंडाभर चांदण्या (Handaabhar Chaandanyaa)
पाण्याच्या एका टॅंकरसाठी तहसीलदारास ओलिस ठेवणाऱ्या व टॅंकरची प्रतीक्षा करणाऱ्या गावातील माणसांची ही गोष्ट केवळ पाण्यापुरती न उरता जागतिक तत्वज्ञानालाच गवसणी घालते.
दगड आणि माती (Dagad Aani Maati)
इतिहास नसलेल्या गावाला काहीतरी आस्तित्व प्राप्त करून देण्याची धडपड करणाऱ्या समकालिन ग्रामीण तरूणाच्या संघर्षाभोवती हे नाटक फिरतं.
कलगीतुरा (Kalgitura)
गावाकडे लयाला गेलेली कलगीतुरा परंपरा मोठ्या खंडानंतर पुनःप्रवाहित करणाऱ्या एका गावातली ही लोकविलक्षण कथा आहे.
तो राजहंस एक (Toh Rajhans Ek)
ग्रामीण भागातील सुशिक्षित व कवी मनाच्या असलेल्या संवेदनशील शेतकरी तरूणाच्या भावनिक आंदोलनांचं नाटक आहे.
दत्ता पाटील लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित, प्रायोगिक नाटकांचा महोत्सव “नाट्य चौफुला” ही संकल्पना अतुल पेठे यांची आहे.
अतुल पेठे यांचे मनोगत (Atul Pethe)
गावोगावच्या नाटकवाल्यांनी आणि सर्वांनी अवश्य पाहावा असा नाट्यचौफुला !
नाशिकचा लेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी गेल्या काही वर्षात या दोघांनी सातत्याने नाटक करत स्वतःचा आलेख उंचावत नेला आहे. या दोघांना त्यांचे त्यांचे म्हणून काही’ रंगविधान’ सापडले आहे. मुख्य म्हणजे त्यांची ही नाटके त्यांची स्वतःची जीवनदृष्टी आहे. ती उसनी नाही, परकी नाही आणि धंदेवाईक नाही.
‘हंडाभर चांदण्या’, ‘तो राजहंस एक’, ‘कलगीतुरा’ आणि ‘दगड आणि माती’ ही चारही नाटके गावाच्या १९९० नंतरच्या भकास स्थितीचा पट उलगडतात. त्यांची भूमी आणि आकाश एकच आहे. कोंडलेले, आक्रसलेले आणि गढूळ ! गावातल्या तरुणांचा आजचा वर्तमान मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या किती उद्ध्वस्त करणारा आहे याचे त्यात भेदक दर्शन आहे. त्यात हरलेपण, हरवलेपण आणि हताशपण आहे. भाषेच्या अंगानेही ती महत्वाची आहेत. ही चारही नाटके उगवलेली आहेत, उबवलेली नाहीत हे महत्वाचे वाटते.
या महोत्सवाच्या पुण्यातील प्रयोगाचे उद्घाटन, लेखक चंद्रशेखर फणसळकर आणि मोहित टाकळकर करणार आहेत. तर ठाण्यातील प्रयोगाचे उद्घाटन, प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी करणार आहेत. ‘एन.सी.पी.ए – मुंबई’, ‘टॅग – ठाणे’, ‘श्रीराम लागू रंग – अवकाश – पुणे’, ‘कॅप्टन निलेश गायकवाड’ आणि ‘सपान – नाशिक’ यांच्या सहकार्याने हा महोत्सव पर पडणार आहे.
नाट्य चौफुला नाट्यमहोत्सवात काम करणाऱ्या कलाकारांची नावे खालील प्रमाणे,
प्राजक्त देशमुख, अनिता दाते, ओंकार गोवर्धन, उमेश जगताप, अश्विनी कासार, धनंजय, नुपूर सावजी, प्रणव प्रभाकर, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, अरुण इंगळे, दीप्ती चंद्रात्रे, हेमंत महाजन, अमेय बर्वे, हेमंत महाजन, ऋषिकेश गांगुर्डे, कविता देसाई, किरण राव, निलेश सुर्यवंशी, प्रवीण जाधव, राम वाणी, ऋषिकेश शेलार, श्रुती कापसे, शुभम लांडगे, विक्रम नांनावरे, कृष्णा शिरसाठ, हेमंत महाजन, बद्रिश कट्टी, कृतार्थ शेवगावकर,जयश्री जगताप, राजेंद्र उगले, प्रफुल्ल दीक्षित, लक्ष्मण कोकणे, रोहित सरोदे, चेतन बर्वे, निखिल मारणे, सौरभ महाजन, ललित कुलकर्णी, सागर अवटे, हृषिकेश गांगुर्डे, राहुल गायकवाड, माणिकनाना कानडे.
असा हा सलग नाट्यानुभव घेण्यासाठी नक्की या दत्ता पाटील लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित आणि अतुल पेठे संकल्पित, प्रायोगिक नाटकांचा महोत्सव ‘नाट्य चौफुला’ला भेट द्या!