Monday, June 14, 2021

लेडीज स्पेशल – महिला दिन विशेष ५ महिलाभिमुख एकांकिकांचा ऑनलाईन कार्यक्रम

- जाहिरात -

८ मार्च, २०२१ रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही रंगभूमी.com तर्फे तुमच्या भेटीस घेऊन येत आहोत ५ महिलाभिमुख विषयांवर आधारित एकांकिका! हा कार्यक्रम जरी लेडीज स्पेशल असला तरी तो समाजातील प्रत्येक वर्गाने बघणे ही काळाची गरज आहे. कारण तिला या समाजाला काहीतरी सांगायचंय. तिच्या मनातलं!

ती… द्वापार युगापासून कलियुगापर्यंत “ती” समाजाला काहीतरी हितगुज सांगू पाहतेय. ती… ती एक देवी, ती द्रौपदी ती सीता, ती आजच्या काळातील मॉडर्न विचारांची बोल्ड अँड ब्युटिफुल तरुणी, ती एक गृहिणी, कधी ती एक गणिका आणि कधी ती एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेली पिडीतसुद्धा! त्यामुळे हे हितगुज ऐकून घेण्यासाठी ८ मार्चला नक्की भेटा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला घराबाहेर पडायचीही आवश्यकता नाही. तुम्ही हा कार्यक्रम ऑनलाईन बघू शकणार आहात.

लेडीज स्पेशल कार्यक्रमात सादर होणाऱ्या एकांकिका पुढीलप्रमाणे आहेत.

सादर होणार्‍या ‘Ladies Special’ एकांकिका:

  1. बिफोर द लाईन (स्वामी नाट्यांगण, डोंबिवली)
  2. नादखुळ्या (नाशिक टॉकिज्)
  3. स्थळ काळ आणि वेळ (प्रयत्न रंगमंच, वसई)
  4. बाजार (बॅकस्टेज प्रोडक्शन, मुंबई)
  5. अशांती पर्व (अभिनय, कल्याण)
- Advertisement -

प्रत्येक एकांकिकेचे शुल्क मात्र ४१ रुपये असून या लेडीज स्पेशल सोहळ्याचा एकत्रित पास मात्र १५१ रुपये असणार आहे. 

पुढील लिंकवर तिकीट विक्री सुरू आहे.

त्वरा करा! तुमचं या एकदिवसीय प्रवासातील तिकीट आजच आरक्षित करा आणि हो! ही लेडीज स्पेशल सुटू देऊ नका. कारण “ती”ला ते आवडणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.