Search for:

एकपात्री अभिनय स्पर्धा २०२० – नियम व अटी

रंगभूमी.com एकपात्री अभिनय स्पर्धा २०२० साठी खालील नियम व अटी लागू असतील:

 1. रंगभूमी.com आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. 
 2. स्पर्धा प्रौढ (वयोगट १६ वर्ष आणि अधिक) आणि बालगट (वयोगट ५ ते १५ वर्ष) अशा २ गटात विभागली जाईल.
 3. बाल वर्गातील (वय ५ ते १५) स्पर्धकांनी पालकांचे संमती पत्र दाखल करणे बंधनकारक आहे.
 4. प्रत्येक वर्गांमध्ये कमीत कमी दहा प्रवेशिका आले तरच स्पर्धा घेतली जाईल. 
 5. सादरीकरणाची भाषा फक्त मराठी असावी. 
 6. व्हिडिओ कमीत कमी आणि जास्तीत जास्त मिनिटांचा असावा. 
 7. अर्ज देण्याची अंतिम तारीख — २०-०४-२०२०
 8. एकदा दाखल केलेला अर्ज मागे घेता येणार नाही.
 9. व्हिडीओ Google Drive, WeTransfer or YouTube वर Upload करून व्हिडीओची link प्रवेशिकेमध्ये दाखल करावी.
 10. तुमच्या सादरीकरणाचा व्हिडिओ दिनांक १ मार्च, २०२० च्या नंतर shoot केलेला असावा. तसेच, इतर कुठल्याही स्पर्धेमध्ये केलेल्या सादरीकरणाचा व्हिडिओ वैध मानला जाणार नाही.
 11. प्रत्येक सादरीकरणाचे प्रवेश शुल्क ₹५१/- आहे. तरीही आमच्या Social Media Accounts ना Like, Follow आणि Subscribe करून स्पर्धक मोफत प्रवेश घेऊ शकतात.
 12. तुमची प्रवेशिका वैध ठरल्यानंतर जर तुम्ही आमच्या Social Media Accounts ना Like, Follow आणि Subscribe करणे बंद केले तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल.
 13. एकच स्पर्धक एकाहून जास्त प्रवेशिका दाखल करू शकतो. परंतु, प्रत्येक दाखल्यासाठी वेगळा अर्ज आणि शुल्क अनिवार्य आहे.
 14. स्पर्धेमध्ये दाखल झालेले व्हिडीओ स्पर्धेच्या आणि Website च्या प्रचारासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारे वापरण्याचे सर्व हक्क पूर्णतः रंगभूमी.com कडे असतील.
 15. स्पर्धेच्या आयोजकांनी घेतलेला प्रत्येक निर्णय अंतिम असेल आणि तो आपल्याला बंधनकारक असेल.
 16. या स्पर्धेचे आयोजक आणि iXyr Media या स्पर्धेच्या नियमात पूर्णतः किंवा अंशत: बदल करण्याचे/  रद्द करण्याचे/ सुधारण्याचे हक्क स्वत:कडे राखून ठेवीत आहे.
 17. स्पर्धकांच्या सादरीकरणाच्या आणि रंगभूमी.com च्या प्रचारासाठी विजेत्यांचे व्हिडीओ रंगभूमीच्या YouTube Channel वर Upload केले जातील.
 18. याव्यतिरिक्त अन्य काही शंका अथवा प्रश्न असतील तर hello@rangabhoomi.com या ई-मेल ID वर आमच्याशी संपर्क साधा.