मराठी नाटकांना उभारी देणारं एक सहज आणि सशक्त असं महत्त्वाचं माध्यम म्हणजे एकांकिका स्पर्धांचं विश्व! कॉलेजमधील कल्ला करणाऱ्या कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देणाऱ्या एकांकिका स्पर्धा… एक तासात अवकाशमय रंगमंचावरील उत्कृष्ट अनुभव देणारी एकांकिका. या एकांकिका विश्वात अनेक दिग्गज कलाकार घडले. अशीच एक मानाची एकांकिका स्पर्धा ‘इंडियन नॅशनल थिएटर’ आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परीमिंग आर्टस् (आयएनटी एबीसीपीए) आंतर महाविद्यालयीन एकांकिकाका स्पर्धा मुंबई शहरात होते. यंदा या स्पर्धेचे ४९ वे वर्ष आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी २४ ते २८ सप्टेंबेर दरम्यान होणार असून अंतिम फेरी १ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. दरवर्षी मुंबईमधील अनेक महाविद्यालय या स्पर्धेतील सहभागातून नवनवीन नाट्यकृती घडवतात तसेच या स्पर्धेतून अनेक कालाकारांना भविष्यात उत्तम संधीही मिळतात. दरवर्षी आयएनटी स्पर्धा मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत होत असून यावर्षी गुजराती भाषेतही एकांकिकांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.
INT ABCPA Inter-Collegiate One-Act-Play Competition 2024 – Entry Form
प्रवेश अर्जासाठी येथे क्लिक करा.
प्रवेश अर्ज पुढील ईमेल आयडीवर किंवा पुढे नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.
ईमेल: [email protected]
स्थळ: आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर पॉर परफॉर्निंग आर्टस्
३८, बीएमसी मार्केट बिल्डींग, बाबुलनाच, दादी सेठ रोड, मुंबई – ४०० ००७
संपर्क क्रमांक: ०२२-२३६७८४१३ | ८६५७८९३०३८ | १८९२७४०००८
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: दि. ३० ऑगस्ट २०२४
INT ABCPA Inter-Collegiate One-Act-Play Competition 2024 – Schedule
प्राथमिक फेरीचे लॉट्स: दि. १३ सप्टेंबर २०२४ • वेळ: सकाळी ११ • स्थळः आयएनटी कार्यालय
प्राथमिक फेरी: दि. २४ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान
अंतिम फेरीचे लॉट्स: दि. २८ सप्टेंबर २०२४ प्राथमिक फेरीच्या निकालानंतर
मराठी अंतिम फेरी: दि. ०१ ऑक्टोबर २०२४ वेळ. दुपारी ३.०० स्थळः यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईट.
INT ABCPA Inter-Collegiate One-Act-Play Competition 2024 – Rules & Regulations
१. प्रवेश फी रुपये १२००/- फक्त.
२. सदर स्पर्धेत मुंबई शहरातील, मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालये आणि संस्था यांना सहभागी होता येईल.
३. स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिकेची संहिता नवीन असावी, त्याचा पूर्वी कुठेही प्रयोग सादर झालेला नसावा. तसेच संहितेचे लेखन कोणत्याही कथा अथवा कादंबरीवर आधारीत असेल तर संबंधित व्यक्तींचे अथवा त्यासंबंधित संस्थांचे परवानगीपत्र आवश्यक आहे.
४. स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांत संपन्न होईल.
५. प्रवेश अर्जासोबत खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
— दिलेल्या तारखेच्या आत संपूर्ण भरलेला प्रवेश अर्ज.
— एकांकिका संहितेच्या ३ प्रती सोबत संहितेचे सारंश लेखन.
— संहिता नवीन आणि एकांकिकेचा पहिलाच प्रयोग असल्याचे विहीत नमुमन्यातील लेखक व महाविद्यालयाचे पत्र.
— रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्राची झेरॉक्स अथवा डिआरएम पावतीची झेरॉक्स.
— एकांकिकेच्या विषयाला अनुसरुन ए २ आकाराचे भित्तीचित्र (पोस्टर) अर्जासोबत देणे बंधनकारक असेल.
६. प्राथमिक फेरी
अ. प्राथमिक फेरीचे सादरीकरण हे संहितेचे परिक्षण आणि तालिम स्वरुपात होईल. सदर फेरीच्या सादरीकरणाच्यावेळी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची गरज नाही.
आ. लॉट्स पद्धतीने एकांकिका सादरीकरणाचे क्रम ठरविले जातील. सदर वेळी संघ प्रतिनिधी उपस्थित नसेल तर सादरीकरणाचा क्रम बदलण्याचा अधिकार स्पर्धा समितीला असेल. संघाला विनाअट मान्य करून सादरीकरण करावे. तसेच प्राथमिक आणि अंतिम फेरीच्या सादरीकरणावेळी कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास पुढील संघाला आयोजक सांगेल त्याप्रमाणे प्रयोग करणे बंधनकाराक असेल.
इ. एकांकिका सादरीकरणात सहभागी कलाकारांची संख्या ही किमान एक पेक्षा जास्त आणि ४० पेक्षा कमी इतकीच मर्यादीत असावी.
ई. एकांकिका २५ मिनिटांपेक्षा कमी आणि ४५ मिनिटांपेक्षा जास्त असू नये. याची स्पर्धक संघाने नोंद द्यावी.
७. अंतिम फेरी
अ. प्रत्यक्ष रंगमंचावरील एकांकिका सादरीकरणात सहभागी कलाकारांची संख्या ही किमान एक पेक्षा जास्त आणि ४० पेक्षा कमी इतकीच मर्यादीत असावी.
आ. अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धक महाविद्यालयांना संहितेसह एकांकिकेतील कोणतेही कलाकार बदलता येणार नाही.
इ. प्रत्येक महाविद्यालय संघास एकांकिका सादर करण्यास एक तासाचा कालावधी देण्यात येईल; यावेळेत स्पर्धक संघाने नेपथ्य, प्रकाशयोजना आदी तांत्रिक बाबी पूर्ण करून प्रयोग करणे, तसेच नेपथ्य हलवून पुनःश्व रंगमंच मोकळा करणे. मात्र प्रत्यक्ष नाट्यप्रयोग २५ मिनिटांपेक्षा कमी आणि ४५ मिनिटांपेक्षा जास्त असू नये. याची स्पर्धक संघाने नोंद द्यावी.
८. महत्त्वाचे →
अ. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवावे. वेळोवेळी तपासले जाईल.
आ. स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकेचा प्रयोग याापूर्वी झाला असल्याची तक्रार आल्यास आणि तपासाअंती सिद्ध झाल्यास परीक्षकांच्या व स्पर्धा समितीच्या निर्णयानुसार कारवाई केली जाईल. तसेच निकाल राखून ठेवणे किंवा पारितोषिक परत घेण्याचे निर्णय समितीला राहिल. त्यामुळे संघाला पुढील ३ वर्षे स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
इ. स्पर्धा काळात विद्यार्थ्यांनी बेशिस्तपणा / असभ्य वर्तन केल्यास गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल. तसेच संपूर्ण संघावर शिस्तभंगची कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ई. एकांकिकेत कोणतेही आक्षेपार्ह लिखाण किंवा सादरीकरण नसावे, तसे आढळून आल्यास रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने आक्षेप घेतल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयाची असेल.
उ. स्पर्धेचे अंशतः आणि संपूर्ण चित्रीकरण करण्याचा अधिकार आयएनटी एबीसीपीएकडे राहतील.
स्पर्धेची बक्षिसे
सर्वोत्कृष्ट एकांकिका – प्रथम, सर्वोत्कृष्ट एकांकिका – द्वितीय, सर्वोत्कृष्ट एकांकिका – तृतीय
सर्वोत्कृष्ट अभिनेता-प्रथम, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम, सर्वोत्कृष्ट अभिनेता – द्वितीय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – द्वितीय, सर्वोत्कृष्ट विनोदी पात्र, सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट भित्तीपत्र
९. चषकाचे नियमः
अ. सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेता महाविद्यालयांना दिलेल्या दोन चषकापैकी मोठा चषक १० महिन्यांनंतर आयएनटी कार्यालयात जमा करावा.
आ. विजेता संघा कडून किंवा महाविद्यालयाकडून चषकाचे नुकसान झाल्यास ते भरून देण्याची जबाबदारी विजेत्या संघासह महाविद्यालयाची असेल.
इंडियन नॅशनल थिएटर म्हणजेच आयएनटी
- इंडियन नॅशनल थिएटर म्हणजेच आयएनटी. १९४४ साली निर्माण झालेली संस्था.
- गुजराती, मराठी, इंग्रजी, पारशी, हिंदी, कन्नड अशा विविध भाषांमध्ये संस्थेने नाट्यनिर्मिती करून कलावंतांना उत्तम रंगमंच उपलब्ध करून दिला.
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन मिळावे या उद्देशाने इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) १९७३ पासून आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करीत आहे.
- मराठी आणि गुजराती भाषांमध्ये पूर्वी नाटक स्पर्धांचे आयोजन करत होते.
- एकांकिका स्पर्धांचे आयोजन आजमितीस करत आहेत.
- २००४ मध्ये आदित्य बिर्ला सारख्या नामांकित कंपनीने आयएनटीसह कलात्मक प्रवास सुरू केला.
- ‘आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परर्फोमिंग आर्टस्’ या नावाने ओळखली जाऊ लागली.
- अध्यक्ष श्रीमती राजश्री बिर्ला असून त्यांची कन्या श्रीमती वसावादत्तजी बजाज यांचा पाठिंबा आहे.
- स्पर्धेतून आजपर्यंत मराठी रंगभूमी गाजवत असलेले कलावंत उदयास आले. स्वाती चिटणीस, विनय आपटे, विजय कदम, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रकाश बुद्धीसागर, सतीश पुळेकर, विजय पाटकर, दीपक राजाध्यक्ष, समीर चौगुले, तुषार दळवी, अंकुश चौधरी, देवेंद्र पेम, किशोर कदम, भरत जाधव, कमलाकार सातपूते, निलक शिर्के, भूषण कडू, अविनाश दाव्हेकर, अदिती सारंगधर, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, संतोष पवार, वीणा जामकर, अद्वैत दादारकर, ऋतुजा बागवे, प्रथमेश परब, इ. ही यादी न संपणारी असेल.
- विनोद हडप, निशिकांत कामत, अंबर हडप, गणेश पंडीत, शिरीष लाटकर, प्रल्हाद कुडतडकर, ऋषिकेश कोळी असे आज आघाडीवर असलेल्या लेखकांची कारकीर्दे आयएनटीच्या एकांकिका स्पर्धातून झाली.
- नेपथ्य आणि प्रकाश योजना हा नाटकाचा अविभाज्य भाग. यातही आयएनटीने यात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची फौज उभी केली.